100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 म
शिवसेना UBT-MNS जाहीरनामा: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन उमेदवारांसमोर सादर केलं. शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 227 उमेदवारांसमोर मुंबईतील शिवसेना भवनात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाचं प्रेझेंटेशन मांडलं. यावेळी मुंबई भविष्याचं आणि मुंबईच्या भल्यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी कटीबध्द असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. (Shivsena UBT-MNS Alliance)
मुंबईत नवीन मेडिकल कॉलेजेस आणि जागतिक दर्जाचं ‘कॅन्सर स्पेशालिस्ट’ महापालिका रुग्णालय उभारण्याचं आमचं स्वप्न आहे. त्यासोबतच महिलांची सुरक्षा आणि त्यांच्यासाठी पोषक कामाचं वातावरण देण्यावर आमचा विशेष भर असेल. ही निवडणूक फक्त जिंकण्यासाठी नाही, तर मुंबईकरांसाठी ही स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लढायची आहे. कारण आम्ही तयार आहोत, एका नव्या आणि अधिक चांगल्या मुंबईसाठी, असं अमित ठाकरेंनी सांगितले.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी कोणत्या घोषणा केल्या? (Shivsena UBT-MNS Manifesto)
- 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ
- मुंबईकरांसाठी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार
- पालिकेचे गृहनिर्माण प्राधिकरण करुन 5 वर्षांत 1 लाख परवडणारी घरे देणार
- घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये
- कोळी महिलांना माँ साहेब किचनमधून 10 रुपयांत जेवण
- तरुणांना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत रोजगार सहाय्यता निधी
- बेस्ट बसचे तिकीट कमी करून 5-10-15-20 रुपये फ्लॅट रेट करणार
- प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर
- मुंबईत नवी पाच वैद्यकीय महाविद्यालये
- महापालिकेचे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारणार
- पाण्याचे दर स्थिर ठेवणार
- मुंबईतील पार्किंग समस्येवर तोडगा काढणार
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या घोषणा, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.