‘मिर्झापूर द मुव्ही’मधून ‘शूरवीर’ गाणे हटवावे; राजस्थान भाजप नेत्याची सेन्सॉर बोर्डाकडे मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजस्थान विधानसभेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते यांनी मिर्झापूर द मुव्ही चित्रपटातील शूरवीर या गाण्याच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. या गाण्यामध्ये महाराणा प्रताप यांना समर्पित असून अमली पदार्थांचे तस्कर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पात्रांशी संबंधित दृश्ये असल्याने, जनभावना दुखावू शकतात असा दावा राठोड यांनी केला आहे.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून चित्रपटातून हे गाणे हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. राठोड यांनी पत्रामध्ये गँगस्टर्स, अमली पदार्थांचे तस्कर आणि गुन्हेगारी पात्रांच्या पार्श्वभूमीवर ‘शूरवीर’ गाण्याचा वापर करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे असे म्हटले आहे.

चित्रपटामध्ये महाराणा प्रताप यांची मूल्ये आणि चित्रपटातील गॅंगस्टर पात्रांचे जग यात मोठा फरक आहे. त्यामुळेच या दोन्हींची सांगड घालणे योग्य नसल्याचे राठोड यांनी नमूद केले. सदर गाण्याच्या वापराबाबत सोशल मीडियावर आक्षेप व्यक्त केले जात असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त भविष्यामध्ये ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांसंदर्भातील गाणी तसेच चिन्हं किंवा संदर्भांचा वापर गुन्हेगारी पात्रांशी करताना, विशेष काळजी घेण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी सेन्सॉर बोर्डाला केली आहे.

Comments are closed.