कलाकेंद्रात गोळीबार, महिला जखमी; पुण्यातील सत्ताधारी आमदाराच्या भावावर रोहित पवारांचा आरोप, पोल
दौंड: दौंड तालुक्यातील एका कला केंद्रामध्ये सोमवारी गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती आहे. दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, पोलिसांचा संशय ज्या कला केंद्रावरती होता, त्या कला केंद्राच्या मालकिनीशी एबीपी माझा संवाद साधलेला आहे. गेली 35 वर्षे झालं मी हे कला केंद्र चालवत आहे. परंतु अशा प्रकारची घटना आमच्याकडे कधीही घडली नाही किरकोळ भांडण झाली तर आम्ही पोलिसांना लगेच बोलवतो. जर आमच्या कला केंद्रात गोळीबारच झाला नाही तर आम्ही का सांगू की गोळीबार झाला म्हणून? जर झाला असता तर आम्ही सांगितलं असतं यातून आमची बदनामी होत आहे असा कोणताही प्रकार आमच्या कला केंद्रात झालेला नाही. तसेच आमच्या कलाकेंद्रातील सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांना दिलेले आहे. त्याच्यामुळे कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कला केंद्राच्या मालकीणीने सांगितलं आहे.
या घटनेवरती रोहित पवारांनी केली पोस्ट
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेबाबच संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत, दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत #अनंत_कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.
दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत…
– रोहित पवार (@rrpspeaks) 23 जुलै 2025
पोलीस माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर…
तर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, आमदाराच्या बंधूनी त्या ठिकाणी गोळीबार केला, त्यात एका महिलेला इजा पोहोचली आहे, पोलीस जर माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हे योग्य ठरणार नाही, उद्या जरी या सगळ्या गोष्टी खाऱ्या निघाल्या तर पोलीस अधिकारी माहिती लपवत आहेत म्हणून कारवाई करावी लागेल. खरी माहिती लोकांसमोर आली पाहिजे, सत्तेतील लोकांचा दबाव आहे,त्या महिलेवर पण दबाव आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.