गोळीबाराच्या घटनेने न्यूयॉर्कमध्ये खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एक 28 वर्षीय तरुण जखमी झाला. ही घटना ब्रॉन्क्सच्या मार्बल हिल परिसरात घडली असून या प्रकारावेळी परिसरात काही नागरिक व शालेय मुले उपस्थित असल्याने घबराट पसरली होती. न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी याबाबत अधिक माहिती देताना गोळीबाराच्या वेळी जखमी व्यक्तीच्या गाडीत एक पाच वर्षांचे मूलही बसले होते असे सांगितले.  सुदैवाने, मुलाला कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. या घटनेमुळे शहरात ‘आयसीई’विरुद्ध संताप वाढला आहे. ममदानी यांनी एजन्सीवर मनमानी कारवाईचा आरोप करत शहरातील तिचे सर्व कामकाज बंद करण्याची मागणी केली आहे. एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्स (एचएसआय) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments are closed.