गायक दिलजीत दोसांझच्या मॅनेजरच्या घरी गोळीबार
बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी; ‘आप’चा भाजपवर हल्लाबोल
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणातील कर्नाल जिह्यातील गोंदार गावात गायक दिलजीत दोसांझचा मॅनेजर, गुरप्रताप कांग याच्या घरावर गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी सोशल मीडियावर या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट टायसन आणि अर्जू बिश्नोई यांच्या सोशल मीडिया पेजवरून टाकण्यात आली होती. दिलजीत दोसांझचे मॅनेजर गुरप्रताप कांग यांच्या घरावर ऑस्ट्रियन बनावटीच्या शस्त्राने गोळीबार करण्यात आला. हा हल्ला टायसन बिश्नोई, त्याचा भाऊ अर्जू बिश्नोई आणि हरी बॉक्सर या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी केला होता. सध्या, कर्नाल पोलीस अशी कोणतीही घटना घडल्याचे नाकारत असले तरी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेवरून आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते अनुराग धांडा यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Comments are closed.