प्रदर्शनाआधीच श्रद्धाचा ‘ईठा’ वादाच्या भोवऱ्यात, विठाबाईंच्या कुटुंबीयांचा नाव बदलण्याचा आग्रह
श्रद्धा कपूर हिचा ‘ईठा’ चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱयात सापडला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाच्या शीर्षकावर त्यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेत नाव बदलण्याची मागणी केली आहे. आईचा संघर्ष मोठ्या पडद्यावर येत असल्याचा अभिमान असला तरी निर्मात्यांनी आधी कुटुंबीयांशी संवाद साधायला हवा होता, असे विठाबाईंचे पुत्र कैलास नारायणगावकर यांनी म्हटले.
Comments are closed.