नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते
श्रेयस अय्यर आयर्लंड विरुद्ध T20I कर्णधार म्हणून पहिली मालिका गमावला: भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंडने भारताचा अवघ्या 1 धावेने पराभव करत मालिका 2-0 अशी खिशात घातली. यासह आयर्लंडने इतिहास रचत पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताला पराभूत केले. ही मालिका भारतीय संघासाठी अनेक अर्थांनी निराशाजनक ठरली. नव्या टी-20 कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली भारताला टी-20 इतिहासात प्रथमच मालिका गमवावी लागली. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वावर पहिल्याच मालिकेत पराभवाचा शिक्का बसला आहे.
आयर्लंडने 2️⃣रा T20I 1 धावाने जिंकून मालिका जिंकली.
साठी पुढील #TeamIndia इंग्लंड विरुद्धची T20I मालिका आहे.
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/L8GAMNqUC4#IREvIND pic.twitter.com/lvGbGWPcVv
— BCCI (@BCCI) 28 जून 2026
अवघ्या एका धावेने भारताचा पराभव
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला विजयासाठी चांगली संधी होती. मात्र अखेरच्या क्षणी भारतीय फलंदाजांना आवश्यक धावा करता आल्या नाहीत आणि संघाला केवळ 1 धावेने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह आयर्लंडने केवळ सामना जिंकला नाही, तर भारतीय संघाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजयही नोंदवला.
टीम इंडियाचा 2-0 ने सुपडा साफ, श्रेयस अय्यर काय म्हणाला? (Shreyas Iyer Ireland sweep India 2-0)
भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ही मालिका आमच्यासाठी निश्चितच चांगली राहिली नाही. त्यासाठी आयर्लंडच्या संघाचे पूर्ण श्रेय द्यावे लागेल… कारण त्याने चांगले क्रिकेट खेळले. त्याचबरोबर त्यांचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम होते. त्यांनी सर्व विभागांत आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली आणि त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन.
पुढे तो म्हणाला की, आज आमच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी आपल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. मात्र फलंदाजीत आम्ही कमी पडलो. खेळपट्टीचा योग्य अंदाज घेण्यात आम्ही अपयशी ठरलो. तसेच एकेरी धावा दुहेरीत रूपांतरित करण्यातही आम्ही मागे पडलो. आयर्लंडने याच बाबतीत आम्हाला मागे टाकले.
पदार्पण करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलाताना तो म्हणाला की, प्रिन्सने आयपीएलमधील अनुभवाचा उत्तम उपयोग केला. त्याच्याकडे गोलंदाजीसाठी स्पष्ट योजना आहेत आणि त्याने आत्मविश्वासपूर्ण कामगिरी केली. सूर्यांशचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानेही चांगला प्रयत्न केला. काही चुका झाल्या असल्या तरी त्यातून तो नक्कीच शिकेल आणि भविष्यात आणखी चांगली कामगिरी करेल. आयर्लंडमध्ये येण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. येथे खेळणे हा माझ्यासाठी सन्मान आणि आनंदाची बाब आहे. धन्यवाद.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.