श्रेयस अय्यरने केली घोडचूक, थेट कर्णधारपदाची ऑफर नाकारली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या इनसाईड स्ट

श्रेयस अय्यर दुलेप ट्रॉफी वेस्ट झोन: आशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून यात मोठे बदल दिसून आले आहेत. स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यात आले, तर जवळपास वर्षभरानंतर शुभमन गिलची टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. एवढेच नाही, तर गिलवर विश्वास दाखवत त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.दरम्यान, श्रेयस अय्यरकडून मोठी घोडचूक झाली आहे. त्याने दुलीप ट्रॉफीत वेस्ट झोन संघाच्या कर्णधारपदाची ऑफर नाकारली. पण या निर्णयामागचं खरं कारण काय? जाणून घ्या संपूर्ण इनसाईड स्टोरी….

श्रेयस अय्यरने वेस्ट झोनच्या कर्णधारपदाची ऑफर नाकारली

दरम्यान, श्रेयस अय्यरने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुलीप ट्रॉफीत वेस्ट झोनचे नेतृत्व करण्यास त्याने नकार दिला, त्यानंतर निवड समितीने ही जबाबदारी ऑलराउंडर शार्दूल ठाकूरकडे सोपवली. ठाकूरने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट झोन निवड समितीचे प्रमुख संजय पाटील (मुंबईचे मुख्य निवडकर्ता) यांनी सुरुवातीला अय्यरला कर्णधारपदाची ऑफर दिली होती. मात्र, अय्यरने ती नाकारली आणि स्वतःला खेळाडू म्हणून उपलब्ध करून दिले. त्यानंतर शार्दूल ठाकूरला ही संधी मिळाली.

आशिया कपमध्ये निवडची वाट पाहत होता श्रेयस अय्यर…

श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी संघात स्थान मिळेल, अशी त्याची अपेक्षा होती. यासाठी त्याने वैयक्तिक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा-कुर्ला संकुलातील एमसीए इनडोअर सुविधा आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडियात पांढऱ्या चेंडूच्या सरावाला सुरुवात केली होती. आशिया कप 9 सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणार असल्यामुळे 4 ते 7 सप्टेंबरदरम्यान बंगळुरूमध्ये होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी अय्यर उपलब्ध राहणार नव्हता. मात्र, राष्ट्रीय निवड समितीने त्याला आशिया कपच्या 15 जणांच्या संघात तर संधी दिलीच नाही, शिवाय राखीव खेळाडूंमध्येही त्याचा समावेश केला नाही.

शार्दूल ठाकूर मुंबई रणजी संघाचं करणार नेतृत्व

दरम्यान, शार्दूल ठाकूर मुंबई रणजी संघाचं नेतृत्व करताना दिसू शकतो. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतेच रणजी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. ठाकूरने मागील रणजी हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत 9 सामन्यांत 35 बळी घेतले, तसेच 505 धावा (एक शतक आणि चार अर्धशतकांसह) काढल्या होत्या. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावरच त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले.

दुलीप ट्रॉफीचे सामने 28 ऑगस्टपासून बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू होत असून अंतिम सामना 11 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईचे नव्याने नियुक्त अंडर-19 प्रशिक्षक किरण पोवार यांना वेस्ट झोनच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे ही वाचा –

Cheteshwar Pujara Retirement : ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा; टीम इंडियाची आणखी एक भिंत ढासळली

आणखी वाचा

Comments are closed.