श्रेयस अय्यरला लॉटरी, थेट टीम इंडियाचं कर्णधारपद मिळणार?; बीसीसीआयचा नेमका प्लॅन काय?

श्रेयस अय्यर: आशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर (India Squad For Asia Cup 2025) करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर झाला. निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संघात स्थान न देऊन पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आशिया चषकाच्या संघात श्रेयस अय्यरला संधी न दिल्यामुळे सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याचदरम्यान, आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

दैनिक जागरणमधील वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला वनडे संघाचा कर्णधार बनवण्याचा बीसीसीआय विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रेयस अय्यरला 2027 च्या विश्वचषकापर्यंत वनडे संघाचं कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. सध्या रोहित शर्माकडे भारताच्या वनडे संघाचं नेतृत्व आहे. मात्र रोहित शर्मा 2027 चा विश्वचषक खेळेल, असे बोलले जात असले तरी ते कितपत शक्य आहे, हे सांगता येणार नाही. रोहित शर्माच्या भविष्याबद्दल निर्णय झाल्यानंतरच श्रेयस अय्यरला कर्णधारपद मिळेल.

शुभमन गिलवर आधीच अधिक जबाबदारी-

कसोटी संघाचं नेतृ्त्व सध्या शुभमन गिलकडे आहे. तसेच आता टी-20 फॉरमॅटचं उपकर्णधारपदही शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. शुभमन गिलवर आधीच बरीच जबाबदारी असल्याने आणि बीसीसीआय त्याच्यावर अधिक भार टाकू इच्छित नसल्याने त्याला वनडे संघाचं कर्णधारपद दिलं जाणार नाही. त्यामुळे बीसीसीआयकडे श्रेयस अय्यर चांगला पर्याय आहे. दरम्यान. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील त्याच्या कामगिरीचा विचार करता, त्याला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून विचारात घेतले जात आहे. त्याने भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आशिया कपसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आानी अर्शदीप सिंग.

आशिया कप 2025 साठी भारतीय संघ-

फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
अष्टपाई: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, क्षरा पटेल.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
गोलांडज: जसप्रीत बुमराह, वरुना चक्रवर्ती, अर्शदिप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.

आशिया कपमधील भारताचे वेळापत्रक

10 सप्टेंबर – विरुद्ध यूएई (दुबई)
14 सप्टेंबर – विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
19 सप्टेंबर – विरुद्ध ओमान (अबू धाबी)

संबंधित बातमी:

शुबडेन गिल: बीसीसीने अनेक दगड ठार मारले आहेत, बीसीसीने अनेक दगड आणि कुणाकुनाचे रत्न मारले आहेत?

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला न निवडण्याचं कारण सांगा, अभिषेक नायरचा BCCI ला थेट सवाल, तुफान फॉर्ममधील खेळाडूला बाहेर ठेवल्याने आश्चर्य

आणखी वाचा

Comments are closed.