शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर

श्रीपाद चिंदम: काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यंदा शिवजयंती (Shiv Jayanti 2026) साजरी करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर वाढलेल्या विरोधामुळे घेतलेली माघार, या ‘यू-टर्न’ची सध्या शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार 6 मार्च रोजी साजरी होत असून राज्यभर शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, ज्यांनी काही वर्षांपूर्वी शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, तेच श्रीपाद छिंदम शिवजयंती साजरी करण्यासाठी पुढे सरसावल्याने शिवप्रेमी, हिंदू संघटना आणि सकल मराठा समाज आक्रमक झाला.

Shripad Chindam : शिवजयंतीसाठी उभारला भव्य स्टेज

छिंदम यांनी अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट परिसरात शिवजयंतीसाठी भव्य स्टेज आणि देखावा उभारला होता. मात्र त्यांच्या सहभागाला जोरदार विरोध सुरू झाला. शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत अशा व्यक्तीला शिवजयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय छिंदम यांनी कार्यक्रम केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देत छिंदम यांना शिवजयंती साजरी करण्यापासून रोखावे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Shripad Chindam : श्रीपाद छिंदम यांची अचानक माघार

दरम्यान, वाढता विरोध लक्षात घेऊन श्रीपाद छिंदम यांनी अचानक माघार घेतली. दिल्लीगेट परिसरात लावलेल्या फलकावरून त्यांनी स्वतःचे नाव हटवून त्याजागी आपल्या मोठ्या भावाचे श्रीकांत छिंदम यांचे नाव लावले. या निर्णयामुळे सध्या शहरात त्यांच्या ‘यू-टर्न’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Shripad Chindam : शिवजयंतीच्या मंचावर श्रीपाद छिंदम उपस्थित राहणार?

काही वर्षांपूर्वी छिंदम यांची छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या घटनेनंतर त्यांच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. शिवप्रेमींच्या मते, त्या घटनेचा डाग पुसण्यासाठी छिंदम हे आता शिवजयंती साजरी करून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र फलकावरून नाव काढल्यानंतर या वादावर काही प्रमाणात पडदा पडल्याचे दिसत असले, तरी शिवजयंतीच्या मंचावर श्रीपाद छिंदम प्रत्यक्ष उपस्थित राहणार का, याकडे आता शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील घडामोड काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Belgaum News: ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गाण्यावरून बेळगावात वाद; आयोजकांविरोधात तक्रार

दरम्यान, धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळताना ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे लावल्याच्या कारणावरून बेळगावातील अनगोळ भागात वाद निर्माण झाला आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेने टिळकवाडी पोलीस ठाण्यात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार दिली आहे. अनगोळमधील राजहंस गल्ली परिसरात धुलिवंदनानिमित्त तरुणांनी रंग खेळत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्यावर नृत्य केले. मात्र हे गाणे लावल्यामुळे कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत कन्नड संघटनांनी आक्षेप घेतला आहे.दुसऱ्या राज्याचे गाणे लावून कन्नड जनतेचा अपमान केल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेने केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा मराठी-कन्नड वादाची चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा

Dhananjay Munde: महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.