शुभमन गिलला आता मोठा धक्का; अभिषेक शर्माची थेट कर्णधारपदी निवड, पुन्हा नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र विरुद्ध पंजाब विजय हजारे ट्रॉफी 2025-26 : 24 डिसेंबरपासून देशातील प्रतिष्ठित देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी क्रिकेटप्रेमींमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. यंदा या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले आहे स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli). तब्बल 15 वर्षांनंतर कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2025/26) पुनरागमन करत असून, तो आंध्र प्रदेशविरुद्ध दिल्ली संघाकडून (Andhra vs Delhi) खेळताना दिसत आहे. बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोहलीच्या पुनरागमनामुळे या सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

शुभमन गिलला आता मोठा धक्का; अभिषेक शर्माची थेट कर्णधारपदी निवड

दरम्यान, दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र आणि पंजाब (Maharashtra vs Punjab) यांच्यात अनंतम मैदान, जयपूर येथे लढत होत आहे. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याआधी पंजाब संघाने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. स्टार फलंदाज शुभमन गिलला पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अभिषेक शर्माकडे थेट कर्णधारपद सोपवण्यात आले. शुभमन गिलचा संघाबाहेर जाणे आणि नव्या कर्णधारांच्या नेतृत्वाखालील संघ या सर्व घडामोडींमुळे विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी स्पर्धेला रंगत आली आहे.

शुभमन गिलची कामगिरी

वयाच्या 18 व्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबकडून लिस्ट ए मध्ये पदार्पण करणाऱ्या गिलने या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले आहे, या फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी 60 पेक्षा जास्त आहे. अलिकडेच दुखापत आणि खराब फॉर्ममुळे त्याला टी-20 विश्वचषक 2026 च्या संघातून वगळले. उजव्या हाताचा हा फलंदाज 2019 च्या अखेरीस हरियाणाविरुद्ध या स्पर्धेत शेवटचा खेळला होता. त्याने डावाची सुरुवात केली आणि 23 धावांवर बाद झाला.

पंजाब संघाची प्लेइंग इलेव्हन – प्रभासिमरन सिंग, अभिषेक शर्मा (कर्नाधर), अनमोलप्रीत सिंग, सलील अरोरा, नमन धीर, रमणदीप सिंग, क्रिश भगत, हरप्रीत ब्रार, सुखदीप बाजवा, गुरनूर ब्र, रघु शर्मा.

महाराष्ट्र संघाची प्लेइंग इलेव्हन – पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, निखिल नाईक, रामकृष्ण घोष, जलज सक्सेना, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, प्रदीप दधे.

हे ही वाचा –

New Zealand Squad For India Tour : रोहित शर्मा-विराट कोहलीविरुद्ध न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची निवड; वनडे मालिकेसाठी चक्रावणारा संघ, कोणा कोणाला संधी?

आणखी वाचा

Comments are closed.