अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवताच शुबमन गिलची कपिल देव-राहुल द्रविड यांच्या 'या' विक्रमाशी बरोबरी, वाचा सविस्तर
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सोमवारी (८ जून) अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. न्यू चंडीगडमधील मुल्लानपूरच्या मैदानावर भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि ३०० धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ५६४ धावासंख्या उभारली होती. दुसरीकडे अफगाणिस्तानचा पहिला डाव १५२ धावांवर संपला. दुसऱ्या डावातही ते केवळ ११२ धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकले. हा विजय भारताचा कसोटी सामन्यांमध्ये डाव आणि धावांच्या फरकाने सर्वात मोठा ठरला आहे. त्याचबरोबर गिलचा एका खास यादीत प्रवेश झाला.
याआधी भारताचा कसोटीमधील सर्वात मोठा विजय २०१८ मध्ये आला होता. तेव्हा भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि २७१ धावांनी पराभूत केले होते.
सर्वाधिक कसोटी सामने एक डाव राखून जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांचा यादीत शुबमन संयुक्तपणे सहाव्या स्थानी आला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा एक डाव राखून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर त्याने कपिल देव, राहुल द्रविड आणि पॉली उम्रीगर यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या तिन्ही दिग्गजांच्या नेतृत्वाखाली भारताने दोनदा डावाने विजय मिळवला.
गिलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला डावातील विजय ऑक्टोबर २०२५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला होता. ५ विकेट्स गमावत ४४८ धावा केल्यानंतर भारताने वेस्ट इंडिजला १६२ आणि १४६ धावांवर सर्वबाद केले होते. तो सामना भारताने एक डाव आणि १४० धावांनी जिंकला होता. भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने डावाने जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १२ वेळा अशी कामगिरी केली आहे.
एका डावाने सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार
१२ – विराट कोहली
९ – एमएस धोनी
८ – मोहम्मद अझरुद्दीन
७ – सौरव गांगुली
४ – रोहित शर्मा
२ – शुभमन गिल
२ – राहुल द्रविड
२ – कपिल देव
२ – पॉली उम्रीगर
Comments are closed.