‘धडक 2’ अवॉर्ड नांदेडच्या दिवंगत सक्षम ताटेला समर्पित, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची रोखठोक भूमि
मुंबई : ‘धडक २’ या चित्रपटात नीलेशची भूमिका साकारून प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मने जिंकणारा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) याला अलीकडेच या भूमिकेसाठी पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र हा सन्मान स्वीकारताना त्यानी तो स्वतःपुरता न ठेवता तो नांदेडमध्ये प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून बळी ठरलेल्या दिवंगत सक्षम ताटे (Saksham Tate) या मृत तरूणाला समर्पित केला आहे. मंचावरून सिद्धांत (Siddhant Chaturvedi) याने सक्षम ताटेला श्रद्धांजली अर्पण करत अत्यंत संवेदनशील मेसेज दिला आहे.
सिद्धांत म्हणाले, “हा पुरस्कार फक्त माझा नाही. जात या आधारावर ज्यांना बहिष्कृत केलं गेलं, दुय्यम वागणूक दिली गेली, भेदभाव सहन करावा लागला, त्यांच्याही जिद्दीचा हा सन्मान आहे. परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी उभं राहण्याचा, लढण्याचा आणि अस्तित्व टिकवण्याचा अधिकार मिळवला. त्यांची ही जिद्द मला सलाम करायला लावते. त्यामुळे हा पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतो, ज्यांच्या मागे त्यांचं कुटुंब, त्यांचा गाव आणि आज माझं मनही उभं आहे.”
यानंतर सिद्धांतनी ‘धडक 2’च्या दिग्दर्शिका शाझिया इकबाल यांचे विशेष आभार मानले. “चित्रपटाला प्रत्येक वादळातून त्यांनी सावरले,” असे त्यानी यावेळी म्हटलं आहे. तसेच लेखक राहुल बडवेलकर यांच्या कार्याची दाद देत, “या कथेतल्या शांततेला त्यांनी खऱ्या अर्थाने आवाज दिला,” असेही सिद्धांतनी यावेळी बोलताना नमूद केले.
या व्यक्तिगत आणि मनापासून केलेल्या समर्पणातून सिद्धांत चतुर्वेदी यांनी आपल्या गौरवाच्या क्षणाचा वापर सामाजिक वास्तवांना आवाज देण्यासाठी केला. त्याचा संदेश स्पष्ट होता ‘धडक 2’सारख्या कथा धैर्याने, धाडसाने, संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणाने सांगितल्या जात राहायला हव्यात. सिद्धांतच्या पुढील प्रकल्पांविषयी बोलायचे झाल्यास, त्यांचा पुढील चित्रपट ‘दो दीवाने शहर में’ येत्या 20 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून, यात ते प्रथमच अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत नव्वदच्या दशकातील प्रेमकथा साकारताना दिसतील.
Saksham Tate: सक्षम ताटे हत्या प्रकरण काय?
नांदेडच्या इतवारा परिसरात काही दिवसापूर्वी प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सक्षम ताटे याचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आचलच्या कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि हिमेश मामीडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशी व दगडाने मारुन सक्षम ताटे याची हत्या (Nanded Murder) केली होती. सक्षम ताटे आणि मामीडवार कुटुंबीय हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. सक्षम ताटे काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. गजानन मामीडवार यांनी सक्षमला त्यांच्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, सक्षम आणि आचल यांचे प्रेमप्रकरण सुरु राहिलेया मामीडकर कुटुंबीयांनी गुरुवारी त्याला संपवले होते. (Nanded girl weds with boyfriend dead body) या घटनेनंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत आले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.