अमेरिकेत शीख ट्रक चालकावर हल्ला
अमेरिकेतील वायोमिंगमध्ये एका 28 वर्षीय पंजाबी शीख ट्रक ड्रायव्हरवर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला. आरोपीने या ड्रायव्हरवर तब्बल 16 वेळा चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्याने पंजाबी तरुणाच्या मानेला, छातीला, हाताला आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अँड्र्यू क्रिस बजडॅक असे आरोपीचे नाव आहे.
Comments are closed.