तिलक वर्माचा विश्वविक्रम थोडक्यात वाचला, हॅरी ब्रूक केवळ 25 धावा मागे राहिला!

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. यामधील दुसरा सामना (17 सप्टेंबर) कार्डिफ येथे खेळला गेला, जो इंग्लंडने 6 विकेट्सने जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने 8 चेंडूंत 23 धावांची खेळी केली, ज्यामुळे भारकीय फलंदाज तिलक वर्माचा विश्वविक्रम मोडता-मोडता वाचला.
तिलकच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये बाद होण्यापूर्वी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. या यादीत हॅरी 25 धावांनी मागे राहिला.
तिलकच्या नावावर जागतिक विक्रम…
तिलक 2024-25 मध्ये एकदा सलग चार डावांमध्ये नाबाद राहिला होता. पाचव्या डावात जेव्हा तो बाद झाला तेव्हा त्याने 18 धावा केल्या होत्या. त्याने बाद होण्याआधी 107*, 120*, 19* आणि 72* धावा केल्या होत्या. त्याने पाच डावांमध्ये विक्रमी 336 धावा केल्या होत्या.
आपल्या तीन डावांमध्ये नाबाद राहिल्यानंतर हॅरी चौथ्या डावात बाद झाला. या डावांमध्ये त्याने 79*, 95*, 114* आणि 23 धावा केल्या. चारही डावांमध्ये मिळून त्याने 311 धावा केल्या आणि तिलकचा विक्रम मोडण्यापासून 25 धावांनी मागे राहिला.
यजमानांची इंग्लंडविरुद्ध मालिकेत 2-0 विजयी आघाडी
पहिला सामना जिंकत मोठ्या आत्मविश्वासाने इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरला. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 विकेट्स गमावत 145 धावा केल्या. पथुम निसांकाने सर्वाधिक 37 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलर आणि ऍन्युरीन डोनाल्ड यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी उभारली. बटलर 30 (16) धावा करून बाद झाला. डोनाल्डने 21 धावा केल्या. त्यानंतर टॉम बॅंटनने इंग्लंडचा डाव सांभाळला. त्याने 24 चेंडूंत नाबाद 52 धावा केल्या.
शनिवारी (19 सप्टेंबर) दोन्ही संघांमध्ये मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जाणार आहे. यामध्ये इंग्लंडचा पाहुण्या संघाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल. (Tilak Varma escaped losing his world record most runs between dismissals in mens T20I Harry Brook fell short by 25 runs)
Comments are closed.