चांदीच्या दराचा विक्रम! 8 दिवसात दरात साडेआठ हजार रुपयांची वाढ, एक किलो चांदीसाठी किती पैसे?
चांदीची किंमत: देशभरात प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या भावात (Silver Price) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसात चांदीच्या दरात जवळपास साडेआठ हजार रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव सर्वोच्च पातळीवर असून एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 1 लाख 5 हजार 200 रुपये मोजावे लागत आहे. हा इतिहासातील सर्वोच्च भाव असून, यामुळं चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाढत्या दरामुळं खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा प्रश्न ग्राहकांच्या मनात येत आहे. सध्या चांदीनं दराची विक्रमी पातळी गाठली आहे. एक किलो चांदीसाठी तब्बल 1 लाख 5 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
गेल्या पाच वर्षात चांदीचे भाव
मार्च 2021 – 62862 किलो
मार्च 2022 – 66990 किलो
मार्च 2023 – 72582 किलो
मार्च 2024 – 77800 किलो
ऑक्टो 2024 – 88400 किलो
मार्च 2025 – 105200 किलो
खामगाव येथील चांदीची बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध असल्यामुळं देशभरातून या ठिकाणी ग्राहक चांदी खरेदी करण्यासाठी येतात. चांदीची भांडी, चांदीची मूर्ती व विविध चांदीचे आभूषणे या ठिकाणी तयार करुन मिळतात व ती 100 टक्के शुद्धतेचे असल्याने खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेवर देशभरातील ग्राहकांचा विश्वास आहे. मात्र आता चांदीच्या किमती वाढल्याने नेहमी गजबजलेली असणारी बाजारपेठ सध्या तरी ग्राहकांनी चांदी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र खामगावच्या बाजारपेठेतून दिसत आहे.
अनेक कारणांमुळे सोन्याच्या किमतीत चढ-उतार
अनेक कारणांमुळे सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असतो. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून आपल्या परंपरा आणि सणांचाही एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सण आणि लग्नसमारंभात सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. यासोबतच जागतिक बाजारात सोन्याची किंमत, सरकारी कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढउतार यांचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. दरम्यान, या वाढत्या दराचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढच होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं दर कधी कमी होणार असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. या काळात सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! सोने खरेदीदारांना मोठा दिलासा, दरात घसरण, कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
अधिक पाहा..
Comments are closed.