Sindhudurg: रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात; रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर
सिंधुदुर्ग अपघात बातम्या: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे गावात रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू (Accident News) झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. तर मृत व्यक्तीमध्ये संकेत घाडी, संतोष गावकर, रोहन नाईक आणि सोनू कोळंबकर या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर
दरम्यान, या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांभुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे रिक्षातील प्रवाशांचे प्राण गमवावे लागले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूढील कारवाई सध्या केली जात आहे. मात्र या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुनेच्या नातेवाईकांनी दिरावर केला प्राणघातक हल्ला
धुळ्यात सासू सुनेच्या किरकोळ वादातून सुनेच्या नातेवाईकांनी तिच्याहन दीर असणाऱ्या शिवम फुलपगारे याला जबर मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना जुने धुळे भागात घडली आहे. सुन असलेली जय फुल हिच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मारहाणीत शिवम फुलपगारे या तरुणाला मानेवर जखम झाल्याने त्याच्यावर धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा किरकोळ स्वरूपाचा असल्याचा आरोप करत खुनाच प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जखमी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे.
जुने धुळे भागात सासू आणि सुनेमध्ये घरगुती वाद झाला होता. या वादातून सून असलेली जया फुलपगारे येणे सासू सरलाबाई फुलपगारे यांना ढकलल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन सासू जखमी झाली. घडलेल्या घटनेमुळे सुनेने घरातून पळ काढला होता. थोड्या वेळात सुनेने नातेवाईकांच्या मदतीने दिरावर प्राण घातक हल्ला केल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.