मालवणमध्ये देशविरोधी घोषणांचे तीव्र पडसाद, मॅचच्या विजयानंतर भंगार व्यावसायिक कुटुंबाचे कृत्य

सिंधुदुर्ग : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानला पराभूत करून विराट विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असतानाच, मालवण-आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी भारत विरोधी घोषणा दिल्याचे पुढे आले आहे. दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी दिवसभरात मालवणात उमटले. तर मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटारसायकलद्वारे विराट निषेध मोर्चा काढून संबंधित कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली गेली. तर देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आडवण येथील भंगार व्यावसायिक पती, पत्नीसह एका अल्पवयीन मुलाविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या परप्रांतीयाकडे स्थानिक आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेशनकार्ड देखील मिळाले आहे.

निलेश राणे यांचे नगरपालिकेला पत्र, अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

दुसरीकडे, देश विरोधी घटनेची तत्काळ दखल घेत आमदार निलेश राणे यांनी परप्रांतीय भंगारवाल्याच्या वस्तीमधील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे पत्र मालवण नगरपालिकेला दिले होते. पत्र मिळातच काही वेळातच या बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आला आणि सदरचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. अशातच रविवारी 9.15 वाजताच्या दरम्यान तारकर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही मुले उभी होती. त्यातील एक मुलगा हा देशाच्या विरोधात घोषणा देत होता. त्याला याबावत विचारणा केली असता त्याने पुन्हा देशविरोधी घोषणा दिल्या.

यावर जाब विचारला असताना त्याने स्थानिकांबरोबर ही अरेरावी केली. अशातच या बाबत माहिती मिळातच अधिक जमाव जमला आणि त्यांनी या घोषणा देणाऱ्याला पोलिसांच्या हवाली केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत मालवण नगरपालिकेने जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत झोपडी आणि त्यांचा अनधिकृत व्यवसाय जमीनदोस्त केला. तर पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

चिपळूण मधील खरवते येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जागेत उभारण्यात आलेल्या लेदर बॉल क्रिकेटच्या भव्य स्टेडियमचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू रिंकू सिंह आणि व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड आणि चंद्रकांत पंडित देखील उपस्थित होते यावेळी रिंकू सिंह आणि व्यंकटेश अय्यर यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती.सीझन बॉल साठी निर्माण केलेल्या खेळपट्टीमुळे भविष्यात ग्रामीण भागातून खेळाडू निर्माण होतील असा विश्वास यावेळी व्यंकटेश अय्यर याने व्यक्त केला.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.