मित्रासोबत शिकारीला जाण बेतलं जिवावर; शिकार समजून झाडलेली गोळी शरीरात घुसली; सिंधुदुर्ग जिल्ह्य
सिंधुदुर्ग: शिकारीदरम्यान बंदुकीची गोळी लागल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची (Sindhudurg Crime News) धक्कादायक घटना घडली आहे. सहकाऱ्यासोबत शिकारीला गेलेला असताना शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी लागून वेर्ले येथील सचिन सुभाष मर्गज या २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची (Sindhudurg Crime News) दुर्दैवी घटना काल (शुक्रवारी, ता ५) घडली. याबाबतची फिर्याद मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी सिप्रीयन ॲन्थॉनी डान्टस याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली (Sindhudurg Crime News) दिली असून रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत युवकाचा मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह स्थानिकांनी घेतली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळावर तपास सुरू होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.(Sindhudurg Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे घडली आहे. बंदुकीतून सुटलेली गोळी शिकारीला आलेल्या सहकाऱ्यालाच लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सचिन सुभाष मर्गज (वय २८) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मर्गज व सिप्रियान डान्टस हे काल (शुक्रवारी, ता ५) सकाळी ओवळीये येथे शिकारीला गेले होते. सिप्रीयन हा बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने उभा होता तर सचिन हा जंगलात हाकारा देण्यासाठी गेला होता.
जंगलातील झुडपामध्ये हालचाल झाल्याचं दिसून आल्याने सिप्रियान याने त्या दिशेने गोळी झाडली. यावेळी काही लांडोर पक्षी उडून बाजूला गेले व त्याचवेळी ‘आई…’ असा मोठा आवाज आला. त्यामुळे सिप्रियान याने त्या ठिकाणी धाव घेतली असता सचिन मर्गजच्या शरीरात गोळी घुसल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळलेला दिसून आला. त्याच्या तोंडावर तसेच छातीत छर्रे घुसले होते. यात अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. .
याबाबतची माहिती मृत सचिनचे वडील सुभाष मर्गज यांना कळल्यानंतर त्यांनी त्याबाबतची फिर्याद सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. याबाबतची फिर्याद मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी सिप्रीयन ॲन्थॉनी डान्टस याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत युवकाचा मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह स्थानिकांनी घेतली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळावर तपास सुरू होता.
आणखी वाचा
Comments are closed.