बिहारमध्ये सहा मुलांचा बुडून मृत्यू.

वृत्तसंस्था/ भागलपूर

बिहारच्या भागलपूर जिह्यात सहा मुले नदीतील पुराच्या पाण्यात बुडून मृत झाली. ही घटना सोमवारी सुलतानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर गावात घडली. मुले आंघोळ करायला गेली असता पाण्याची खोली माहीत नसल्यामुळे सर्व मुले बुडून मरण पावली. मृतांमध्ये चार मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी बचावकार्य सुरू केले, परंतु सहा मुलांना वाचवता आले नाही. या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून, कुटुंबीय दु:खात आहेत. पोलिसांनी सर्व सहा मुलांचे मृतदेह बाहेर काढून पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवले.

Comments are closed.