CRPF Vehicle Accident सीआरपीएफच्या वाहनाला अपघात, 6 जवान जखमी
► वृत्तसंस्था श्रीनगर
जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिह्यातील गगनगीर बोगद्याजवळ शुक्रवारी एक भीषण रस्ते अपघात घडला. सीआरपीएफचे वाहन रस्त्यावरून घसरल्याने सहा जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.
अपघातानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. सर्व जखमी जवानांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी गुंड येथील सीआरपीएफ छावणीत आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Comments are closed.