मोठी बातमी! कोलंबो कसोटी वाद प्रकरणात ICC ऍक्शन मोडमध्ये, जैस्वाल-फर्नांडो यांच्यावर केली कडक कारवाई

कोलंबोमध्ये सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी घडलेल्या घटनेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऍक्शन घेतली आहे. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्या दोघांवर ICC ने कडक कारवाई केली आहे.
या घटनेत आयसीसीला खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आचारसंहितेच्या कलम 2.12 चे उल्लंघन झाल्याने आढळून आले. यामुळे जैस्वाल आणि फर्नांडोला त्यांच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला आहे. तसेच दोघांनी प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
मागील 24 महिन्यांच्या कालावधीत दोन्ही खेळाडूंवर कोणताही गुन्हा दाखल नव्हता.
(बातमी अपडेट होत आहे)
Comments are closed.