मोठी बातमी: स्मृती मानधनाचे वडील आता ठणठणीत, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; आता कधी होणार लग्न?
स्मृती मानधना वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना आज सकाळी सर्वहित हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची तब्येत आता स्थिर असून कोणताही धोका नाही. डॉक्टरांनी केलेल्या अँजिओग्राफीमध्ये कोणताही ब्लॉकेज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानधना कुटुंबाने मोठा निश्वास टाकला आहे. दरम्यान, पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या पुढे ढकललेल्या विवाहाबाबत कुटुंब काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर आता विवाहाची नव्याने तारीख जाहीर होते का? याची उत्सुकता सगळ्यांना आहे, पण अजून तरी लग्नानाबाबत कोणती अपडेट आली नाही.
स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना काय झालं होतं?
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच्या विवाहसोहळ्यात रविवारी (23 नोव्हेंबर) होणार होता. घर सजलं होतं, दारात मंडप पडला होता, पाहुणे येऊ लागले होते… पण रविवारी सकाळी नाश्त्याच्या वेळी अचानक तिचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडली. पहिल्यांदा हा त्रास काही मोठा नसल्याचे वाटत होते. पण काही मिनिटांत परिस्थिती गंभीर बनली आणि त्यांना तातडीने सांगलीतील रुग्णालयात दाखल करावे लागले. ही माहिती स्मृतीचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी दिली. यानंतर पलाशची सुद्धा पित्ताचा त्रास वाढल्याने त्याला सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पलाश आणि स्मृती 2019 मध्ये भेटले
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल 2019 मध्ये भेटले. त्यांची भेट मुंबईत एका मित्रामार्फत झाली. त्यांची मैत्री प्रेमात फुलली. त्यांनी शांतपणे त्यांचे नाते पुढे चालू ठेवले. जवळजवळ पाच वर्षांनंतर, 2024 मध्ये, त्यांनी नात्याची घोषणा केली. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, ते अखेर लग्नबंधनात अडकणार होते. मुच्छल यांनी स्मृतीला नवी मुंबईतील DY पाटिल स्टेडियममध्ये खास पद्धतीने प्रपोज केले होते. त्यांनी 21 नोव्हेंबरला या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, जो अजूनही त्यांच्या अकाउंटवर दिसत आहे.
स्मृती मानधनानंतर लग्नाला गेलेल्या टीम इंडियातील खेळाडूंनीही तेच केलं
स्मृतीने आपल्या लग्नाच्या सर्व पोस्ट, अगदी प्रपोज केलेला व्हिडिओ सुद्धा डिलीट केला. त्यानंतर जेमिमा आणि श्रेयंनकानेही आपले व्हिडिओ काढून टाकले. यामुळे चर्चांना आणखी उधाण आले, लग्न मोडलं का? दोघांमध्ये काही बिनसलंय का? या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत कुटुंबीयांनी स्पष्ट केले की, लग्न मोडलं नाही, तर फक्त अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. सध्या संपूर्ण लक्ष स्मृतीच्या वडिलांच्या आरोग्यावर आहे. पण आता स्मृती मानधनाचे वडील आता ठणठणीत आहे आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे, त्यामुळे विवाहाची नव्याने तारीख जाहीर होते का? याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.