IND-W vs ENG-W: लॉर्ड्सवर स्मृती मानधनाने रचला नवा इतिहास! क्रिकेट वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव
भारतीय महिला संघ (Indian cricket women’s team) सध्या लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळत आहे. (test match between IND-W vs ENG-W) या सामन्यात भारतीय उपकर्णधार स्मृती मानधनाने (Smriti Mandhana created history) एक नवा इतिहास रचला आहे. हा तिच्या करिअरमधला 300 वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.
यासोबतच ती जगातील सगळ्यात कमी वय असणारी खेळाडू ठरली आहे. जिने 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिच्या या कामगिरीच्या जोरावर तिने अतिशय कमी वयात भारतीय संघाची जबाबदारी सांभाळत आपल्या खेळाने भारतीय संघाचा दर्जा नेहमीच उंचावलेला आहे.
स्मृती मानधना ही 300 आणि त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील 12 वी महिला खेळाडू ठरली आहे, तर भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास ती 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी भारतासाठी फक्त दोन महान खेळाडूंनी हा इतिहास रचला होता. यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 374 सामन्यांसोबत ती पहिल्या क्रमांकावर आहे. त्यासोबत त्यानंतर महान खेळाडू मिताली राज (Mithali Raj) यांचं नाव आहे. मिताली यांनी 333 सामने खेळले आहेत. त्यानंतर आता स्मृती मानधनाने सुद्धा 300 सामने खेळले आहेत. त्यामुळे तिचं नाव सुद्धा या दिग्गज खेळाडूंच्या यादीत आता सामील झाले आहे.
हा सामना फक्त स्मृती मानधनासाठी नाही तर पूर्ण भारतीय महिला क्रिकेट संघासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण, इंग्लंडमध्ये याआधी 19 वेगवेगळ्या मैदानांवर एकूण 55 महिला कसोटी सामने खेळले गेले आहेत पण क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदा महिला कसोटी सामना खेळला जात आहे. जर महिला संघाच्या कसोटीचा इतिहास बघितला तर इंग्लंडमध्ये सगळ्यात जास्त 9 सामने वूस्टर काऊंटी ग्राउंडवर आणि 6 कसोटी सामने द ओव्हल मैदानावर खेळले गेले आहेत.
इंग्लंडच्या मैदानावर भारतीय कसोटी संघाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघ आपला दहावा सामना खेळत आहे. याआधी खेळलेल्या 9 सामन्यात टीम इंडियाने 2 सामन्यात विजय मिळवला होता तसेच बाकी सामने बरोबरीवर संपवण्यात आले होते. सर्वात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट ही की, भारतीय महिला संघ आजपर्यंत इंग्लंडमध्ये एकही कसोटी सामना पराभूत झालेली नाही.
Comments are closed.