स्मृती मानधना की पलाश मुच्छल, कोण सर्वात श्रीमंत; दोघांचं नेटवर्थ किती?
स्मृती मानधना, पलाश मुच्छाल नेट वर्थ: क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांनी तब्बल 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नाच्या आदल्या रात्री व्हायरल झालेल्या पलाश मुच्छलच्या फ्लर्टी चॅटनं सगळ्यांचंच टेन्श वाढवलं. मेहंदी, हळद समारंभ आणि अगदी संगीत सोहळ्यापर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं. पण, अचानक स्मृती आणि पलाशचं लग्न (Smriti Mandhana Palash Muchhal Wedding) रद्द करण्यात आल्याचं समोर आलं आणि त्यासाठी कारण सांगितलं गेलं, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती. लग्नाच्या आदल्या रात्रीच स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं समोर आलं आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलचे फ्लर्टी चॅट्स व्हायरल झाले आणि त्याचवेळी स्मृतीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिचे आणि पलाशच्या प्रीवेडिंग, लग्नापूर्वीच्या समारंभाचे सर्व फोटो डिलीट केले आणि जोरदार चर्चांना उधाण आलं. दोघांमध्ये नेमकं काय झालं? पलाशनं स्मृतीला खरंच फसवलंय का? यांसारख्या चर्चा रंगल्यात. पण, अद्याप दोघांच्या कुटुंबीयांकडून यासंदर्भात कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर रंगलेली. तसेच, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही दोघांचे चाहते खूप खूश होते. पण, दोघांच्या नात्यात मिठाचा खडा नेमका कशामुळे पडलाय? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. अशातच, दोघांच्या करिअरबाबत आणि नेटवर्थबाबत बोलायचं झालं तर, दोघेही कोट्याधीश आहेत. आता पलाश आणि स्मृती दोघांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण? दोघांचं नेटवर्थ किती? सविस्तर जाणून घेऊयात…
स्मृती मानधनाचं नेटवर्थ किती?
टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या नेटवर्थबाबत बोलायचं झालं तर, तिची एकूण संपत्ती 34-35 कोटी रुपये आहे. स्मृतीचं सेंट्रल BCCI सोबत सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत तिला वर्षाखेरीस 50 लाख रुपयांचा पगार मिळतो. याव्यतिरिक्त तिला सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीही वेगळी फी मिळते. स्मृती मानधना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एका वनडे सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी के लिए 3 लाख रुपये मिळतात. याव्यतिरिक्त स्मृती मानधना वुमन्स आयपीएलमध्येही खेळते. तिला महिला प्रिमियर लीगच्या पहिल्या सीझनमध्ये 3.4 कोटी रुपयांना आरसीबी संघानं विकत घेतलं होतं. महिला प्रीमियर लीगमध्ये RCB ला विजय मिळवून दिल्यानंतर तिची ब्रँड व्हॅल्यू वाढली. स्मृती मानधना ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील कमाई करते आणि यासाठी ती अनेक कंपन्यांशी जोडली गेली आहे.
पलाश मुच्छलचं नेटवर्थ किती?
पलाश मुच्छल म्हणजे, बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ. पलाश मुच्छलनं 2014 मध्ये ‘ढिश्कियाऊं’ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केलेली. त्यानं अनेक सिनेमांसाठी गाणी गायलीत. पलाश मुच्छलच्या नेटवर्थचे स्पष्ट आकडे नसले तरीसुद्धा नेटवर्थच्याबाबतीत तो स्मृती मानधनापेक्षा कमी नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पलाश मु्च्छलचं नेटवर्थ 24-41 कोटी रुपयांमध्ये आहे. तो फिल्मची गाणी आणि कित्येक म्युझिक रिलेटेड प्रोजेक्ट्समधून कमाई करतो.
दरम्यान, पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या एकत्रित संपत्तीबाबत बोलायचं झालं तर, दोघेही 50 ते 75 कोटींचे मालक आहेत. तसेच, दोघांचंही करिअर पीकवर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.