Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
सोलापूर गुन्हा आई मुलीची आत्महत्या: सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एका आईने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बार्शी शहरातील (Barshi News) वाणी प्लॉट परिसरात ही घटना घडली. मृत महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे असे आहे. अंकिता ही विवाहित असून तिला 14 महिन्यांचा मुलगा होता. अंकिताने आपल्या चिमुरड्याला विष (Poision) पाजून त्यानंतर साडीने गळफास लावून आत्महत्या (Suicide News) केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. मात्र, यामध्ये अंकिता यांचा मुलगा अन्विक उकिरडे हा वाचला आहे. परंतु, त्याची प्रकृती गंभीर आहे. अंकिता उकिरडे यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे वाणी प्लॉटसह बार्शी शहरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर बार्शी पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे. (Solapur News)
अंकिता यांनी आपल्या 14 महिन्यांच्या लहान बाळाला विष पाजल्यानंतर त्याचा मृत्यू होईल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, अन्विक उकिरडे याचा जीव वाचला आहे. या चिमुरड्याला तातडीने बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. त्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती अद्याप गंभीर आहे. आता त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात येणार आहे. या बाळावर सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
अंकिता हिचे लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी झाले होते. घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता घरात चिमुकल्यासह एकटीच होती. नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या मोलकरीण महिलेला घरात कोणी दिसले नाही. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं असता, अंकिता सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. तर चिमुकला अन्विक अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला होता.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.