सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्रीच एकनाथ शिंदेंच्या गळाला, लवकरच होणार पक्षप्रवेश?

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून काँग्रेसला हादरा देणारी मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress)  माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (एकनाथ शिंदे) यांची भेट घेतली आहे.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळेमुळं काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री राहिले आहेत. एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर सिद्धाराम म्हेत्रे हे आपल्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत. त्यानंतर ते शिवसेना शिंदे गटाच जाण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सिद्धाराम म्हेत्रे यांनी जर काँग्रेस सोडली तर सोलापूर जिल्ह्यात हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का असणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील मोठे नेते समजले जातात. तसेच त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम देखील केलं आहे. त्यामुळं त्यांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

मराठी: तेव्हा मी पायलट होतो, फडणवीस आणि अजित दादा को-पायलट; आम्ही योजनांचं टेकऑफ केलं : एकनाथ शिंदे

अधिक पाहा..

Comments are closed.