बनावट आधार कार्डद्वारे सोलापुरात राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना अटक

सोलापूर : बनावट आधार कार्डचा (Fake Aadhaar card) वापर करुन सोलापुरात (Solapur) राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi citizen) पोलिसांनी (Police) अटक केली आहे. सोलापुरातील एमआयडीसी (Solapur MIDC) परिसरातील एका गारमेंट कारखान्यात हे सर्वजन कामगार म्हणून कामाला होते. सोलापूर शहर पोलिसांना या बाबतीत गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी या सर्व बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत चौकशी केली आहे. यावेळी त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

बनावट कागदपत्र कशी आणि कुठून मिळवली? याचा तपास सुरु

दरम्यान, या सर्व लोकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज  न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती सोलापूर पोलीस आयुक्तांनी दिली आहे. शिवाय सोलापुरात राहण्यासाठी त्यांना कोणी मदत केली? त्यांनी बनावट कागदपत्र कशी आणि कुठून मिळवली? याचा तपास देखील सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली आहे.

भारतात अवैद्य मार्गाने घुसखोरी

भारतात अवैद्य मार्गाने घुसखोरी करून बनावट आधार कार्ड बनवून सोलापूर शहरात वास्तव्य करत असलेल्या बारा बांगलादेशींना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. श्री जगंदबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औदयोगिक संस्था मर्या सोलापूर, अंध व अंपग कार्यरत असणारी सहकारी औदयोगिक संस्था प्लॉट नं 20/2 ई आर टी चौक एमआयडीसी रोड सोलापूर या ठिकाणी 5 मार्च रोजी हे बांगलादेशी पोलिसांना सापडले आहेत.नासीर सरकार मो. बदी उज्जमान वय-२२ वर्षे, रा- ग्राम तैगोरिया भाग राजशाही जि नाटोर बांग्लादेश २) मोहम्मद नजीरउल्ला इस्लाम वय-३० वर्षे रा- कौदमपल्ली जि भोगुर बांग्लादेश ३) मोहम्मद मिजानूर रोहमन, वय-२६ वर्षे, रा- नेत्रकोना बांग्लादेश ४) बाबुमिया सुलतान वय-२५ वर्षे, रा- कोदंलपुर गोसाई राहत शरियतपुर बांग्लादेश ५) शफिक रशिद मोडंल वय-३१ वर्षे, रा-ढाका बांग्लादेश ६) मोहम्मद रहुलआमीन खलील फोराजी वय-३३ वर्षे, रा-परगना पश्चिम बंगाल रावगा बांग्लादेश ७) इम्रान नुरआलम हुसेन वय-२७वर्षे, रा- कोदंलपुर गोसाई राहत शरियतपुर बांग्लादेश ८) महमद हजरतअली पोलाश वय ३१ वर्षे, रा- ग्राम काजीबारा जि बोगुरगा राजशाही बांग्लादेश ९) महमद हजरतअली पोलाश वय ३१ वर्षे, रा- ग्राम नारहट्टा तथा तहालून जि बुगुरा बांग्लादेश १०) मोहम्मद सोहेल जाबेदअल्ली सरदार, वय-२२ वर्षे, रा- ढाका बांग्लादेश ११) अलाल नुरइस्लाम मियाँ वय-३५ वर्षे, रा-नॉर्थ परगना पश्चिम बंगाल १२) मोहम्मद अलीमीन हानिफ बेफिरी, वय-२९ वर्षे, रा- नॉर्थ परगना पश्चिम बंगाल देश बांग्लादेश अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींची नावे आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैदय प्रवासी परवानगी, कागदपत्राशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी (नोदंणी) अधिकारी यांचे लेखी परवानगी शिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधारकार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करीत असताना मिळून आले म्हणून वरील आरोपीताविरूध्द कायदेशीर फिर्याद दाखल आहे. या बांगलादेशी नागरिकांना सोलापुरात श्री जगदंबा औद्योगिक संस्थेमध्ये कुणी वास्तव्यास ठेवले होते, याचा तपास केला जात असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Bhiwandi Crime : भिवंडीत नऊ बांगलादेशी महिलांना अटक, चाळ मालकाविरोधातही गुन्हा दाखल

अधिक पाहा..

Comments are closed.