धक्कादायक! जावयानं केली सासऱ्याची हत्या, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न, सोलापुरात खळबळ
सोलापूर क्राईम न्यूज : दक्षिण सोलापूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. इंगळगी गावातील जावयाने सासऱ्यावर धारदार चाकूने वार करत हत्या केली आहे. त्यानंतर आरोपी जावईने स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सिकंदर मुलका शेख असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सादिक सैफन दफेदार असे आरोपी जावयाचे नाव आहे.
आरोपीने स्वतःवरही वार करून घेतल्याची माहिती समोर
मयत सिकंदर शेख यांचा मुलगा आणि मुलगी पोलीस खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सादिक दफेदार याने शेतात सिकंदर शेख यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या पंचनामा सुरू असून, नेमका खून कोणत्या कारणातून झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
भिवंडी-वसई रेल्वे मार्गावर दुर्दैवी अपघात; रेल्वेच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू
भिवंडी तालुक्यातील खारबाव नजीक भिवंडी-वसई रेल्वे मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात चिंचपाडा येथील रहिवासी शेतकरी चंद्रकांत जाऊ पाचमारे (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाचमारे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतावर गेले होते. शेतावरून घरी परतत असताना रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक आलेल्या रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते रेल्वेखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी भिवंडी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास संबंधित रेल्वे प्रशासन व पोलिसांकडून सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.