महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी व्यक्तीची हत्या, सोलापूर हादरलं

सोलापूर क्राईम न्यूज : सोलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.  महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी सामुदायातील व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. सोलापुरातील लष्कर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. संशयित आरोपी सिसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. अय्युब सय्यद असे मृत्यू झालेल्या पारलिंगी व्यक्तीचे नाव आहे.

अय्युब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून इच्छुक

अय्युब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते. तसे विडिओ फोटो त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले असून त्याला लाखोंच्या संख्येने व्हिव्ज आहेत. सीसीटीव्हीच्या दृश्यानुसार काल रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसम हे अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करत होते. तेच तीन इसम रात्री 2 च्या सुमारास परत जाताना दिसत आहेत. आज दुपारी ही मृत्यूची घटना उघडकीस आल्याने या अज्ञात तीन इसमानीच अय्युब यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.

cctv मध्ये दिसणाऱ्या तीन संशयित आरोपीचा शोध सुरु

दरम्यान, या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी cctv मध्ये दिसणाऱ्या तीन संशयित आरोपीचा शोध सुरु केला आहे. दरम्यान अय्युब यांची हत्या नेमकी कशामुळे झाली? याचा तपास देखील सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

Badlapur Neerja Ambekar Death Case : बदलापुरमधील महिला काँग्रेस नेत्याला संपवलं; सर्पदंश, ब्रेन हॅमरेज, नंतर हत्या, नवऱ्यानेच घरात साप…; 3 वर्षानंतर नीरजा आंबेकरांच्या मृत्यूचा उलगडा

आणखी वाचा

Comments are closed.