मित्राच्या गळ्यात चाकू आरपार भोसकला अन् चिरला, मैत्रिणीच्या छातीत खुपसला 3 वेळा चाकू, मध्यरात्र
सोलापूर: लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री खळबळजनक घटना घडली. कारने प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला (Latur-Solapur Highway) केला. यात ३७ वर्षीय अनमोल केवटे (रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले, चाकू गळ्यात आरपार (Crime News) घातला तर सोनालीच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वार केल्याचे समजते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनमोलचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सोनालीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल व सोनाली हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यानिमित्त लातूरला आले होते. परत सोलापूरकडे जात असताना या दोघांवर हल्ला झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. (Latur-Solapur Highway)
कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने…
कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादावादीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे (वय ३४, रा. मंद्रूप, द. सोलापूर) याचा चाकूनं भोसकून खून करण्यात आला तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले-सुपेकर (वय ३२ रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर १२:४५ वा. खाडगाव रोड, लातूर येथे घडली.
दोघांमध्ये बाचाबाची, शिवीगाळी झाली
मिळालेल्या माहितीनुसार, कारचा चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे (वय २८, खडकगल्ली, बाळे) याने लातूर येथील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये घटनेची फिर्याद दिली आहे. यातील मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे बुधवारी अ.भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते. सोनाली भोसले यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. पद देण्यासाठी त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले. पाच नंबर चौक, खाडगाव रोडने औसाकडे येताना जीप (एम.एच.२६/ व्ही. २३५६) ओव्हरटेक करत असताना कट लागला. यावेळी चालकाने शिवी दिली. त्याला अनमोल केवटे यानेही दमबाजी केली. पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्याच्या आडवी केली. केवटे व सोनाली भोसले गाडीतून खाली उतरले. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची, शिवीगाळी झाली. दोघांत झटापट झाली. दुसरा इसम गाडीतून उतरला आणि त्याने अनमोल केवटे यांच्या गळ्यात चाकूने आरपार भोसकले. समोरून दोन वेळा गळ्यावर तर दोन वेळा पोटात चाकूने भोसकले. केवटे जागेवरच कोसळले. तोपर्यंत सोनाली व दुसरा इसम एकमेकांचे केस धरून एकमेकांना मारत होते. चाकूने त्यांच्यावरही पाठीत, पोटात वार करण्यात आले. केवटे यांच्या चालकाने घटनेची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोन अनोळखी आरोपीवर बीएनएस ३६७/२५ कलम १०३(१), १०९(१), १२६(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जिरगे अधिक तपास करीत आहेत.
तिच्या छातीत तीन वेळा आणि पाठीवर दोन वेळा चाकू भोसकला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जीप रस्त्यात आडवी लावून अनमोल केवटे आणि त्याची मैत्रीण सोनाली भोसले यांच्याशी वाद घातला. वाद वाढताच दोघेही कारमधून खाली उतरले. याच क्षणी हल्लेखोरांनी जवळील धारदार चाकूने अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर वार केला. गंभीर जखमी झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर सोनालीवर हल्ला करत तिच्या छातीत तीन वेळा आणि पाठीवर दोन वेळा चाकू भोसकण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत तीही जमिनीवर पडली. हल्ला करून आरोपी तात्काळ पसार झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.