मनोहर मामानंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; वीरकर महाराजला साखर झोपेतच पोलिसांनी उचलं

सोलापूर क्राईम न्यूज : भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा (Manohar Mama Bhosale) याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या भोंदू बाबा मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात असून दिवसास्कोअरर त्याच्या अडचणीत वाढ होत आहे. अशातच भोंदू मनोहर भोसलेनंतर सोलापूर जिल्ह्यात आणखी एका भोंदू बाबाला (सोलापूर भोंदूबाबा) टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फसवणूक (Crime) जादूटोणा अशा पद्धतीचे आरोप आहेत. माढा तालुक्यातील आडेगाव येथे नाना महाराज उर्फ गुरु माऊली विरकर यांनी भोंदूगिरी (Bhondubaba) करून आपले चांगलेच बस्तान बसविले होते. मोठमोठे राजकीय नेते देखील या भोंदूच्या भजनी लागलेली होते. अनेक राजकीय नेत्यांचा याच्याकडे राबता असल्याने जादूटोणा भविष्य सांगणे आणि अशाच पद्धतीने लोकांची फसवणूक (Crime News) करण्याचे काम हा वीरकर महाराज बिनबोभाटपणे करीत होता. अशातच फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यावर वीरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आज पहाटेच साखर झोपेत असताना टेंभुर्णी पोलिसांनी गुरुमाऊली वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास विरकर यांना आडेगाव येथील आश्रमातून ताब्यात घेतले आहे.

Solapur Crime : माझ्याकडील कासव घे, पैशाचा पाऊस पडतो म्हणत फसवणूकगुरुमाऊली वीरकर आणि मोठ्या भावाला अटक

पंढरपूर तालुक्यातील एका पीडितेला 2024 पासून व्यवहारात भरपूर पैसे मिळवून देतो, माझ्याकडील कासव घे, पैशाचा पाऊस पडतो. अशा पद्धतीची फसवणूक या वीरकर महाराजांनी केली होती. यातील पीडित तरुणाचा व्यवसाय तर वाढला नाहीच, मात्र कर्जाचा डोंगर वाढत गेला. आत्तापर्यंत जवळपास पाच लाखापेक्षा जास्त रुपयाची फसवणूक झाल्याचा दावा या पीडितीने केला असून आज पहाटे टेंभुर्णी येथे दोन लाख 35 हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यावर वीरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पहाटेच साखर झोपेत असताना टेंभुर्णी पोलिसांनी गुरुमाऊली वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास विरकर यांना आडेगाव येथील आश्रमातून ताब्यात घेतले आहे. या भोंदू बाबांनी ज्यांची ज्यांची फसवणूक केली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.