तुमचे देव सैतान, त्यांना पाण्यात फेकून आमचा धर्म स्वीकारा! सोलापूरात धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्

सोलापूर क्राइम न्यूज: सोलापुरातील (Solapur) सेटलमेंट परिसरात एका फादर विरोधात धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तुमचे देव शैतान आहेत, त्यांना पाण्यात टाकून आमचे धर्म स्वीकारा. तुम्हाला 10 हजार रुपये दिले जातील. असे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या एका कथित फादर विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रवी फादर असे या 55 वर्षीय कथित फादरचे नाव आहे. (Solapur Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय रवी फादर याने सोलापुरातील सेटलमेंट परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये चर्च तयार केले होते. तेथे त्याने महिलांना सांगितले की, “तुमचे देव शैतान आहेत, आणि ते तुमचे कल्याण करणार नाही. त्यांना पाण्यात टाकून आमचे देव स्वीकारा. आम्ही तुम्हाला 10 हजार रुपये देऊ, ” असे आमिष दाखवले.

लाल रंगाचे पेय आणि ब्रेड खाण्यासाठी दिले, महिलांचा आरोप

20 जुलै रोजी रवी फादर याच्या चर्चमध्ये काही महिलांना या प्रकाराचा अनुभव आला. रवी फादर याने महिलांना वाईन सदृश्य लाल रंगाचे पेय आणि ब्रेड खाण्यासाठी दिले, असा आरोप महिलांनी केला आहे. यानंतर संबंधित महिलांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी कथित फादर रवी फादर याच्या विरोधात सोलापूरच्या सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सोलापूरमध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ

दरम्यान, सोलापूर शहरात घरफोडीच्या उद्देशाने ‘चड्डी गँग’ पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं समोर आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान शहरातील वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी या परिसरांमध्ये चार संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत असल्याचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे या चौघांनी चेहऱ्यावर कापड बांधलेलं असून, काळा टी-शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेली होती. त्यांच्या हातात दगड आणि घरफोडी करताना उपयोगात येणारी काही साधनं असल्याचं देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलं आहे. या गँगकडून घरांची पाहणी करून नंतर चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी दाराच्या बाहेर असलेल्या वस्तू हलविल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी तत्काळ पावलं उचलून ‘चड्डी गँग’ला ताब्यात घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Ahilyanagar Crime News : ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले

आणखी वाचा

Comments are closed.