अंगावरील सोनं पाहून नियत बदलली, मित्रांनीच काढला तृतीयपंथी मित्राचा काटा, सोलापूर हादरलं
सोलापूर क्राईम न्यूज : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर महापालिका निवडणूकीत इच्छुक असलेल्या तृतीयपंथी अय्युब सय्यदची हत्या करण्यात आल्याची घटना काल घडली होती. यानंतर पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्यांना अटक केली आहे. अय्युबच्या अंगावरील सोने, रोकडं, मोबाईल, गाडी पाहून मित्रांचीच नियत बदलल्याचे समोर आले आहे. चोरीच्या उद्देशाने तृतीयपंथी अय्युबची त्याच्या मित्रानींच हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
हत्येंनंतर अवघ्या सहा तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत आरोपींना केली अटक
यशराज कांबळे, आफताब शेख, वैभव पनगुले अशी आरोपींची नावे आहेत. हत्येंनंतर अवघ्या सहा तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत आरोपींना अटक केली आहे. तिन्ही आरोपी मूळचे लातूरचे असून तिघेही विद्यार्थी आहेत. आरोपी वैभव पनगुले हा इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री आरोपी यशराज कांबळे हा मृत अय्युब सय्यद हे दोघेही सोबत घरी आला होता. त्यानंतर काही वेळाने आरोपी आफताब शेख आणि वैभव पनगुले हे देखील अय्युब याच्या घरात दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळाने तिन्ही आरोपींनी उशीने तोंड दाबून अय्युब सय्यद याची हत्या केली आहे. त्यानंतर त्याच्याजवळ असलेले दागिने, रोकड आणि गाडी घेऊन ते पसार झाले होते. या तिन्ही आरोपीच्या सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून पुढील तपास केला जात आहे.
आरोपींनी चोरलेले दागिने पोलिसांनी केले जप्त
दरम्यान आरोपींनी चोरलेले दागिने देखील पोलिसांनी जप्त केलेत, सोने खरे आहे की खोटे यांचा तपास देखील सुरुय अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली. दरम्यान, या धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं आहे.
अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून इच्छुक होते
yeubly सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते. तसे विडिओ फोटो त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले असून त्याला लाखोंच्या संख्येने व्हिव्ज आहेत. सीसीटीव्हीच्या दृश्यानुसार परवा रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसम हे अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करत होते. तेच तीन इसम रात्री 2 च्या सुमारास परत जाताना दिसत आहेत. काल दुपारी ही मृत्यूची घटना उघडकीस आल्याने या अज्ञात तीन इसमानीच अय्युब यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना व्यक्त केला होता.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी व्यक्तीची सोलापुरात हत्या, संशयित आरोपी CCTV मध्ये कैद
आणखी वाचा
Comments are closed.