सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य

सोलापूर क्राईम न्यूज: उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी स्वतःच्या तीन चिमुकल्या मुलांना विष पाजून स्वतःही विष प्राशन (Suicide news) केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील (Solapur News) तिऱ्हे गावात घडली आहे. भीमा अण्णा वाघमारे (वय 34) असे विष प्राशन केलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. (Maharashtra Crime news)

प्राथमिक माहितीनुसार, भीमा वाघमारे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. नातेवाईकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र, महिलेने सासरी परत येण्यास नकार दिला होता. याच मानसिक तणावातून भीमा वाघमारे यांनी आपल्या जानवी, प्रगती आणि बाबू या तीन लहान मुलांना वळसंगजवळील शेतात नेले. त्याठिकाणी त्यांनी तिन्ही मुलांना विष दिले आणि त्यानंतर स्वतःही विष घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत भीमा वाघमारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तर तिन्ही लहान मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून तिन्ही मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा

काकांना पेपर चांगला गेल्याचं फोनवर सांगितलं, मैत्रिणींबरोबर वेळ घालवला, मैत्रिणी जेवायला जाताच महाविद्यालयीन तरुणीचं टोकाचं पाऊल

पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्याचा मोठा गौप्यस्फोट, अमोल मिटकरीही संतापले

आणखी वाचा

Comments are closed.