पुण्यावरून गाडी नेऊन अपहरण, पडळकरांच्या कार्यकर्त्यासोबत ‘मस्साजोग’ करायचं होतं, पण अपहरणकर्त्य
शरानू हँड केस: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मस्साजोग गावात झालेलं सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण चांगलंच तापलं. यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या, त्यानंतर आताही असाच काहीसा प्रकार होता होता राहिला. सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे राजकीय वैमनस्यातून अपहरण करून हत्या करण्याचा कट रचला होता अशी माहिती आहे, मात्र काही गोष्टींमध्ये गडबड झाली आणि अपहरण झालेला समर्थक शरणू हांडे वाचला. नाहीतर त्याच देखील मस्साजोग झालं असतं.
पुण्यातून गाडी बोलावली, अपहरण केलं अन्….
अपहरण प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित सुरवसे याने तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा आणि अपमानाचा बदला घ्यायचं ठरवलं होतं. बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने सुरुवातीला पुण्यातून झूम अॅप वरून एक सेल्फ ड्रॉईव्हर कार भाड्याने घेतली. सोबत सुनील पूजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने, राकेश कुदरे, श्रीकांत सुरपुरे हे मित्र देखील त्याच्या मदतीला होते. पुण्यातून गाडी भाड्याने घेतल्यानंतर हे सगळे आरोपी सोलापुरात पोहोचले. शरणू हांडे हा सोलापुरातील साई नगर भागातल्या राज बियर शॉपीजवळ आल्यानंतर गाडीतून आलेल्या आरोपींनी शरणूवर हल्ला केला. घटनास्थळी शंकर बारोळे नावाच्या व्यक्तीने हा सगळा प्रकार पाहिला आणि शरणू याला वाचवण्याचे पहिले प्रयत्न बारोळे यांनी केले. मात्र आरोपीनी शस्त्राचा धाक दाखवल्याने ते मागे हटले आणि आरोपीनी शरणू याला कोयत्याने मारहाण करून चार चाकी गाडीत टाकून त्याचे अपहरण केले.
शरणू याचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्लॅन, पण अपहरणकर्त्यामध्ये वाद
संध्याकाळी 4.30 च्या सुमारास शरणू हांडे याचे अपहरण केल्यानंतर आरोपी अक्कलकोटच्या दिशेने निघाले. पोलिसांना अपहरणाची बातमी मिळताच शहर पोलिसानी ग्रामीण पोलिसांना देखील घटनेची माहिती दिली. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मात्र नाकाबंदीची कुणकुण लागल्याने आरोपीनी गाडी कर्नाटकच्या दिशेने वळवली. कर्नाटकच्या निंबाळ गावात गेल्यानंतर अमित सुरवसे याने शरणू याचा कायमचा बंदोबस्त करायचा, अपमानाचा बदला अपमानाने घेण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण करायचा असा प्लॅन सांगितलं. अमितचा हा प्लॅन ऐकून अपहरणकर्त्यांमध्येच दोन गट पडले. एका गटाने ‘कायमचा बंदोबस्त’ करण्यासाठी विरोध केला. तर दुसरा गट कायमचा बंदोबस्त करण्यावर ठाम होता, जवळपास अर्धा तास अपहरणकर्त्यांमध्ये हा वाद सुरूच होता. याचं वादामुळे जो वेळ गेला तीच संधी पोलिसांना अपहरणकर्त्यापर्यंत पोहोचण्यात मदतशीर ठरली आणि शरणूचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसांना यश आलं.
शरणूचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच सोलापूरचे पोलिसांनी आयुक्त एम. राजकुमार यांनी तातडीने उपायुक्त विजय कबाडे आणि उपायुक्त आश्विनी पाटील यांना तपासाचे आदेश दिले. दोन्ही उपायुक्त स्वतः संपूर्ण घटनेची माहिती घेत गांभीर्य ओळखून चार पथक शरणू आणि आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. घटनास्थळावर मिळालेल्या सिसिटीव्हीवरून गाडी अक्कलकोटच्या दिशेने जातं असल्याने दोन पथक अक्कलकोटच्या दिशेने रवाना करण्यात आले. गाडीची ओळख पटू नये यासाठी आरोपीनी नंबर प्लेटवर चिखल लावला होता. मात्र सुदैवाने वळसंग येथील टोल नाक्यावर गाडीचा नंबर पोलिसांना मिळाला.
आणखी वाचा
Comments are closed.