सोलापूर जिल्ह्यात खळबळ! किरकोळ कारणावरुन वाद पेटला, गेल्या 72 तासात सहा जणांचा अंत
सोलापूर क्राईम न्यूज : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 72 तासांत घडलेल्या सलग हत्यांच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या घटनांमध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. किरकोळ वाद ते संपत्तीवरुन वाद अशा कारणामुळे थेट क्रूर हत्यांपर्यंत पोहोचलेल्या या घटनांमुळे सोलापुरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ‘रक्तरंजित सोलापूर’ अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जाणून घेऊयात घटनांबद्दल सविस्तर माहिती.
कुठे आणि कधी झाली हत्या?
1 मे – ठिकाण : उळे गाव, दक्षिण सोलापूर – संजय शिंदे यांची चाकू भोसकून हत्या
2 मे – ठिकाण : वैराग, बार्शी – दिनेश कापसे याची दगडाने ठेचून हत्या
2 मे – ठिकाण : बोरामणी, दक्षिण सोलापूर- गायत्री मस्के, प्रिया आणि शिवराज मस्के या तिघांची हत्या
3 मे – ठिकाण : 70 फूट रोड, सोलापूर शहर – सुरेश श्रीराम याची कोयताचे वार आणि दगडाने ठेचून हत्या
मागील 72 तासात 6 जणांची निर्घृण हत्या
किरकोळ वाद ते संपत्तीची वाटणी अशा कारणामुळे झालेल्या या हत्याकांडामुळे सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. 1 मे रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगावात किरकोळ कारणावरुन संजय शिंदे यांची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. घरी का जायला सांगितलं? या क्षुल्लक कारणावरून आरोपी अतुल शिंदेने थेट संजय शिंदे यांच्या छातीत चाकू खुपसला, यामध्ये संजय शिंदेचा मृत्यू झाला आहे.
दुसरी घटना बार्शी तालुक्यातील वैराग शहरात घडली आहे. मित्राला पोलिस स्टेशनमध्ये जायचा सल्ला का दिला? या एवढ्या कारणावरून मित्राने मित्राची दगडाने ठेचून हत्या केली. दिनेश कापसे असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर बबलू मुळे असं आरोपी तरुणाचे नाव आहे.
तर दिवशी सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला. संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची तलवारीने हत्या करण्यात आली. गायत्री मस्के, प्रिया मस्के, शिवराज मस्के या तिघांचा या घटनेत मृत्यू झाला.
उळे, वैराग, बोरामणी हे प्रकरण ताज असतानाच रविवारच्या सकाळने सोलापूरशहरातील अत्यंत गजबजलेल्या 70 फुट रोडवर भर दिवसा एकाची हत्या केली सहा जणांच्या टोळक्याने सुरेश श्रीराम याची कोयता आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. वराह पालनाच्या मुद्यावरून सुरु झालेला वादाचे रुपांतर थेट हत्येत झाले. मागील 72 तासांत किरकोळ वादातून सुरू झालेल्या या चारही घटनांनी थेट सहा जणांचा बळी घेतला आहे. यामुळे वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासनासाठी ही मोठी कसोटी ठरत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.