12 वर्षांपासून रिलेशनशिप, दोन वर्षाचा संसार, भांडणानंतर त्यानं दुसरीकडे लग्नाचा घाट घातला, व्हि
सोलापूर : सोलापुरातून काल (गुरूवारी, ता २) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरातील बाळे परिसरातील तृतीयपंथीय प्रकाश उर्फ व्यंकप्पा कोळी (वय २२) यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (Solapur Crime News) केली, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवून आपल्या जवळच्यांना पाठवला, या व्हिडीओमध्ये (Solapur Crime News) आपला प्रियकर सुजित याने तरुणाने दीड वर्षांपूर्वी लग्न (Solapur Crime News) केले. घरदार, बहीण, गुरू यांना सोडून स्वतंत्र संसार थाटला, आता तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी सोडल्याची आपली व्यथा मांडली. या प्रेमाच्या त्रिकोणात काल (गुरुवारी) प्रियकराच्या हळदीच्या दिवशी आत्महत्या केली. या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल प्रियकर सुजित अप्पासाहेब जमादार (रा. वैद्यवाडी, प्रियंका चौक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. (Solapur Crime News)
Solapur Crime News: भाड्याच्या घरात पत्र्याच्या अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला
घटनेबाबत मिळलेल्या माहितीनुसार, प्रकाशने सकाळी नऊच्या सुमारास बाळे परिसरातील साईनगर परिसरातील भाड्याच्या घरात पत्र्याच्या अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला, नातेवाइकांनी त्याला बेशुद्धावस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. या घटनेची माहिती कळताच सोलापूरमधील तृतीयपंथी समूहातील अनेकजण रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने एकवटले. सुजितला जबाबदार धरणारा व्हिडीओ प्रकाशने मृत्यूपूर्वी तयार केल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. हा व्हिडीओ कधी काढला आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. शिवाय त्याचा मोबाइलही पोलिसांनी जप्त केला आहे. प्रकाश आणि सुजित हे पूर्वी वैद्यवाडी, प्रियंका चौक या भागात राहत होते. त्याच सुमारास दोघांची ओळख झाली. त्यातूनच दोघांचे प्रेम जमले आयुष्यभर तुझ्यासोबतच राहीन, लग्न करणार नाही, अशी शपथ सुजितने घेतल्याचे प्रकाशचा भाऊ नागेश याने म्हटले आहे. मात्र, पैसे, सोनं घेतलं आणि फसवलं, आणि आता त्याने दुसरं लग्न करत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
तर मृतांच्या भावाने नागेश याच्या मते, तृतीयपंथी प्रकाश आणि सुजित यांचे दिड ते दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. त्याने त्याचा व्हिडीओ तयार करून नातेवाइकांकडे पाठवला होता. लग्नानंतर ते दोघे सोबत राहू लागले. दोघांमध्ये भांडणे होऊ लागल्याने प्रकाशने पाच महिन्यांपूर्वी बाळे येथे स्वतंत्र खोली केली. सुजित हा त्या खोलीवर नियमितपणे येत असे.
Solapur Crime News: आत्महत्येआधी प्रकाशने व्हिडीओ काय सांगितलंय?
मी हे पाऊल उचलत आहे, याचा जबाबदार फक्त सुजित हा आहे. माझ्याशी लग्न केलं, खोटं प्रेम केलं. आठ वर्ष सोबत राहिला. माझ्याशी लग्न करून घर करून येथे ठेवलं. मला माझ्या जोगती समाजापासून लांब ठेवलं अन् आता तो दुसरं लग्न करतोय. या सगळ्यास जबाबदार फक्त तोच आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार, पाच भावंडांमधील प्रकाश हा चौथ्या क्रमांकाचा होता. लहानपणापासून तो मुलींसारखा वागत असल्याने रीतिरिवाजाप्रमाणे गळ्यात मोती बांधून तो तृतीयपंथीय समूहात सामील झाला होता. स्विटी असे त्याचे नामकरण करण्यात आल्याचे भाऊ नागेश याने जबाबात नमूद केले आहे.
तर बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशचे सुजितशी प्रेमसंबंध होते. त्याने प्रकाशशी लग्न केले. आठ वर्षांपासून त्याला बाळे येथे घेऊन गेला. त्यानंतर आता दुसरे लग्न करण्याचे ठरवले. प्रियकराने दिलेला धोका प्रकाशला सहन झाला नाही. भावाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सुजितवर कठोर कारवाई करावी, असं म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.