दारूच्या मैफिलीत थट्टा जीवावर बेतली, मित्रांनीच काढला मित्राचा काटा; सोलापुरात रक्तरंजित थरार

सोलापूर क्राईम न्यूज : सोलापूर (Solapur) शहर पुन्हा एकदा हादरलंय. अक्कलकोट रोडवरील समाधान नगर परिसरात घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मित्रांसोबत दारू पीत बसलेल्या तरुणाची चेष्टा-मस्करी जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल घेण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून दोन मित्रांनी एकाच तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Solapur Crime News)

ही धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील समाधान नगर येथील वंडरलँड सिटी शेजारी असलेल्या राज बिअर शॉपीच्या मागील परिसरात घडली. या घटनेत शेकुंबर महिबूब नदाफ (वय 39, रा. समाधान नगर, सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Solapur Crime News: मोबाईल घेतल्याच्या कारणावरून झाला वाद

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकुंबर नदाफ हे श्रीकृष्ण देशमुख आणि मल्लीनाथ माशाळे या दोघांसोबत दारू पीत बसले होते. यावेळी थट्टा-मस्करी सुरू असताना मोबाईल देण्या-घेण्याच्या कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा असलेला हा वाद काही क्षणातच उग्र झाला.

Solapur Crime News: डोक्यात दगड घालून मित्राला संपवलं

रागाच्या भरात मल्लीनाथ माशाळे याने शेकुंबर नदाफ यांना हाताने चापटा मारल्या, तर श्रीकृष्ण देशमुख याने शिवीगाळ करत रागात मोठा दगड उचलून थेट शेकुंबरच्या डोक्यात मारला. या मारहाणीत शेकुंबर नदाफ हे जागीच बेशुद्ध पडले. घटनास्थळी उपस्थितांनी मदतीचा प्रयत्न करण्यापूर्वीच काही वेळात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणी मृत शेकुंबर नदाफ यांच्या पत्नी सायरा मेहबूब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकृष्ण देशमुख आणि मल्लीनाथ माशाळे (दोघेही रा. समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime News: तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!

Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.