दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या सोबत भिडला; वादात शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्त्याचा बळी, महिला गं

सोलापूर: लातूर-सोलापूर मार्गावर बुधवारी मध्यरात्री खळबळजनक घटना घडली. कारमधून प्रवास करणाऱ्या अनमोल केवटे (रा. मंद्रुप, जि. सोलापूर) आणि सोनाली भोसले (रा. अंत्रोली, जि. सोलापूर) यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अनमोलचा जागीच मृत्यू झाला तर सोनाली गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेत विष्णू मामडगे यासह चौघांचा सहभाग असल्याचे समोर आले. रेनापुर तालुक्यातील रहिवासी असलेल्या या सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीप चालविताना कारला कट दिल्याने वाद झाला. त्यानंतर शिवीगाळ करत अनमोलला गळ्यावर-छातीवर वार केले, तर भांडण सोडवायला आलेल्या सोनालीवरही हल्ला झाला.

मृत अनमोल केवटेचे प्रोफाईल

अनमोल केवटेचे मूळ गाव मंद्रुप, जि. सोलापूर, तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ता असल्याचे सांगत असे. तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत होता. त्याच्यावरती पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मारामारी, खंडणी वसुली यासांरखे गुन्ह्यांची नोंद आहे.त्याला सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं. समितीच्या लातूर मेळाव्यासाठी आलेला होता.तर जखमी सोनाली भोसले मूळ गाव अंत्रोली, जि. सोलापूर आहे. विवाहित आहेत, त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. मागील काही वर्षांपासून समितीत कार्यरत आहेत. लातूर मेळाव्यासाठी अनमोलसोबत आली होती

संशयित आरोपी

मुख्य आरोपी विष्णू मामडगे तो  क्रुझर जीपचा मालक आहे. गुन्हेगारी वृत्ती असलेला तो आहे. त्याच्यावर काही गुन्हे आहेत त्याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे, शुभम पतंगे, वैभव स्वामी अशी आरोपींची नावे आहेत. शुभम पतंगे, वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विष्णू आणि मंथन मामडगे फरार आहेत. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हालचाली सुरू केल्या. शुभम पतंगे आणि वैभव स्वामी यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी विष्णू मामडगे व त्याचा साथीदार मंथन मामडगे यांचा शोध घेण्यासाठी लातूर पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत.

ओव्हरटेक करताना कट लागला

कार आणि जीप यांच्यातील किरकोळ कटाच्या कारणावरून झालेल्या वादातून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अनमोल अनिल केवटे (३४, रा. मंद्रूप, जि. सोलापूर) याचा निर्घृण खून करण्यात आला, तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले-सुपेकर (३२, रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर) गंभीर जखमी झाल्या आहेत. ही धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजता लातूरच्या खाडगाव रोडवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी लातूर येथे आले होते. बैठकीनंतर जेवण करून ते सोलापूरच्या दिशेने परतत होते. खाडगाव रोडवर पाच नंबर चौकाजवळ कार आणि जीप (MH-26/V-2356) यांच्यात ओव्हरटेक करताना कट लागला. यावरून शिवीगाळ आणि दमबाजी झाली. पुढे काही अंतरावर जीप आडवी लावून हल्लेखोरांनी कार अडवली.

गळ्यावर, मानेवर आणि पोटात वार

वाद चिघळताच अनमोल आणि सोनाली कारमधून उतरले. यावेळी हल्लेखोरांनी धारदार चाकूने अनमोलवर तुटून पडत गळ्यावर, मानेवर आणि पोटात वार केले. त्यामुळे ते जागीच कोसळले. त्यानंतर सोनालीवरही हल्ला करत तिच्या छातीत तीन वार व पाठीवर दोन वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत ती जमिनीवर पडली. घटनेनंतर आरोपी पसार झाले. अनमोलचा चालक नवनाथ धाकपाडे (२८) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी हल्लेखोरांविरोधात बीएनएस कलम ३६७/२५, १०३(१), १०९(१), १२६(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जिरगे करीत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.