एकाच स्कार्फने तरुण-तरुणीने गळफास घेऊन संपवलं जीवन; शेवटच्या चिठ्ठीत केला ‘नात्याचा’ उल्लेख, घ
सोलापूर: सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, शहर परिसरामध्ये एकाच स्कार्फने तरुण-तरुणीने गळफास घेत जीवन संपवलं (Solapur Crime News) असल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्यापूर्वी (Solapur Crime News) या दोघांनी भाऊ-बहीण असल्याचा उल्लेख लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये केल्याची माहिती समोर आली आहे. सोलापुरातील कर्णिक नगर येथील ही घटना आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Solapur Crime News)
आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत
रोहित ठणकेदार, अश्विनी केशापुरे असे आत्महत्या (Solapur Crime News) करणाऱ्या तरुण-तरुणीचे नाव आहे. मयत अश्विनीने रोहितची ओळख कुटुंबियांना मानलेला भाऊ अशीच करून दिलेली होती. मात्र मयत रोहित याच्या कुटुंबियांना अश्विनी बद्दल कोणतीही माहिती नसल्याचा कुटुंबियांचा दावा आहे. ‘आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत, त्यामुळे आत्महत्या केल्यानंतर आमच्यावर शंका घेऊ नका’ असा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये (Solapur Crime News) केल्याची माहिती आहे. (Solapur Crime News)
रोहित ठणकेदार हा चालक तर अश्विनी फार्मसीचे शिकत होती
रोहित ठणकेदार हा चालक म्हणून काम करत होता. तर अश्विनी ही कर्नाटकातील एका महाविद्यालायत बी फार्मसीचे शिक्षण घेत होती. दरम्यान दोघांनी आत्महत्या केल्याची मिळताच कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात प्रचंड आक्रोश व्यक्त केला. याप्रकरणाची सिव्हील हॉस्पिटल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर पोलीस आत्महत्यामागे नेमके काय कारण आहे, याचा तपास करत आहेत. (Solapur Crime News)
रोहित ठणकेदार हा तरुण अविवाहित
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी केसापुरे ही मृत तरुणी सोलापुरातील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यामध्ये डी फार्मसी कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेत होती. सुट्टीसाठी अश्विनी सोलापुरात (Solapur) येत होती. गुरुवारी सकाळी अश्विनी शाहीर वस्ती येथील राहत्या घरातून कॉलेजला म्हणजेच बागलकोटला (कर्नाटक) निघाली होती. सायंकाळी अश्विनीच्या घरच्यांना एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) माहिती दिली. तर रोहित ठणकेदार हा तरुण अविवाहित होता आणि एका ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. मृत अश्विनीच्या नातेवाईकांनी माहिती देताना सांगितले, मागील एक दोन वेळा अश्विनीला भेटण्यासाठी घरी आला होता. अश्विनीकडे नातेवाईकांनी विचारणा केली असता मानलेले बहीण भावाचे नाते आहे, अशी माहिती दोघांनी विचारपूस करणाऱ्यांना दिली होती.(Solapur Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.