‘अशा मुली कॅरेक्टरलेस असतात’, बेकायदेशीर कर्ज मंजुरीला नकार दिल्यानंतर सोलापुरात महिलेचा छळ
सोलापूर : राज्यात एकीकडे फलटण महिला डॉक्टरचे प्रकरण गाजत असताना इतर ठिकाणच्या महिलाही सुरक्षित नसल्याचं अनेक घटनांमधून समोर येत आहे. सोलापुरातली अशीच एक घटना घडली. बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयातीएल (किष्ट फायनान्स सोलापूर) निम्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरातील या पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर कंपनीने त्याची दखल तर घेतलीच नाही, उलट पीडितेलाच ‘अशा मुली कॅरेक्टरलेस असतात’ अशी शेरेबाजी करणाऱ्या कंपनीच्या एचआरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किष्ट फायनान्स सोलापूर बातम्या: महिलेसाठी स्वतंत्र वॉशरुम नव्हते
सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीमध्ये एकूण 14 व्यक्ती कामाला असून केवळ एकच महिला कर्मचारी कामाला होती. त्यामुळे तिच्यासाठी स्वतंत्र वॉशरूमदेखील व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. उलट पीडिता वॉशरूमचा वापर करायला जाताना आरोपींनी तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत छेड काढल्याची घटनाही अनेकदा घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सोलापूर गुन्हे: तरुणी आत्महत्येच्या मानसिकतेमध्ये होती
मागील अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे पीडित तरुणी ही प्रचंड मानसिक दबावाखाली आली होती आणि ती आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली होती. सुदैवाने पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पीडित तरुणीचे मानसिक समुपदेशन केल्याने अनर्थ टळला आहे.
महिला कर्मचाऱ्याच्या शोषण प्रकरणी सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीचे सोलापूर ब्रँच मॅनेजर निलेश पायमल्लेसह एकूण 10 आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Ajit Pawar On Phaltan Case : फलटण प्रकरणी अजित पवारांची नाराजी
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं पद धोक्यात आलंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात चाकणकरांनी केलेल्या वक्तव्यावरून खुद्द अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. रूपाली ठोंबरे यांच्या फोनवरून अजित पवारांनी कुटुंबाशी संवाद साधला. आपण रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असं अजित पवार म्हणालेत.
मी सत्याच्या बाजूने नेहमी असतो, असं अजित पवार म्हणाले. रूपाली चाकणकर यांनी मृत डॉक्टर महिलेच्या चारित्र्याचं हनन केलं, असा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.