मोठी बातमी: काँग्रेसची घोडदौड सुरु, कोल्हापुरात 48, सोलापूरमध्ये 20 उमेदवार जाहीर!

सोलापूर महापालिका निवडणूक 2026 काँग्रेसची पहिली उमेदवार यादी: सोलापुरात काँग्रेस पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Solapur Municipal Election 2026 Congress First Candidate List) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 10 प्रभागातील 20 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने केली जाहीर (Congress First Candidate List Solapur) केली आहे. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह 20 जणांना काँग्रेसने उमेदवारी दिली. यामध्ये माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सून सीमा यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख यांच्या कन्या सबा परवीन शेख, माजी महापौर संजय हेमगड्डी यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठीही काँग्रेसची पहिली यादी जाहीर- (Kolhapur Municipal Election 2026)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजी छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा यादीत समावेश आहे.

संबंधित बातमी:

Congress First Candidate List : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांची नावे, कोणाला संधी?

आणखी वाचा

Comments are closed.