निवडणूक काळात खोटे गुन्हे दाखल कराल तर सावधान, जनशक्ती शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाने लढवली शक्कल


सोलापूर बातम्या : निवडणूक काळात सत्ताधारी पक्षाकडून पोलिसांना हाताशी धरत विविध पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढत असते. यातून बचाव करण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी अनोखी शक्कल लढवत आपल्या गाडीतही सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस बसवला आहे. याचा एक्सेस थेट पोलिसांना दिला असून आपली गाडी कुठे फिरते आपण गाडीत कुणाशी बोलतो याचे सर्व पुरावे पोलिसांना मिळणार आहेत.

स्थानिक निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधी नेते व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नेहमीच दाखल होत असल्याच्या तक्रारी पाहायला मिळत असतात. मात्र अशा होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यापासून वाचण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची ‘अनोखी शक्कल’ लढविली आहे. आता हीच शक्कल बाकीच्या विरोधी नेते आणि कार्यकर्त्यांनी लढविल्यास असे खोटे गुन्हे दाखल होऊ शकणार नाहीत असा विश्वास अतुल खूपसे यांना वाटत आहे.

कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी एक अत्यंत अनोखी आणि प्रभावी शक्कल लढवली

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः साखर कारखाने किंवा विविध वंचित घटकांसाठी आंदोलने करणाऱ्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याची तक्रार येत असतात. या पार्श्वभूमीवर, जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी एक अत्यंत अनोखी आणि प्रभावी शक्कल लढवली आहे. सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांच्या आरोपांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि घडामोडींचे सत्य रेकॉर्ड ठेवण्यासाठी, अतुल खूपसे पाटील यांनी आपल्या वाहनामध्ये आतल्या बाजूने जीपीएस (GPS) सह सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे, त्यांच्या प्रत्येक हालचालीचा आणि बैठकांचा पुरावा सुरक्षित राहील.

भविष्यासाठी खबरदारी म्हणून घेतला निर्णय

आठ दिवसापूर्वी अतुल खूपसे यांच्यावर एक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी भविष्यासाठी ही खबरदारी घेत अशा पद्धतीने शक्कल लढवली आहे. यापूर्वी अतुल खूपसे यांनी स्वतःच्या घरी कार्यालयात अगदी स्वतःच्या शेतातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. मात्र बाहेर प्रवास करीत असताना सर एखाद्याने खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला तर सीसीटीव्ही आणि जीपीएस ऍक्सेसमुळे त्यांचे लोकेशन आणि सत्यतेचे पुरावे मिळू शकणार आहेत. या सर्वाचा एक्सेस पोलिसांना आणि यंत्रणा नाही मिळू शकणार असल्याने आता आपल्यावर असे खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत असा त्यांचा विश्वास आहे. मात्र यानंतरही कोणी नेत्यांचे ऐकून सूडबुद्धीने आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास त्यावर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन संबंधित नेता आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी हे पुरावे दिले जातील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.