हृदयद्रावक! एकुलत्या नातवाचा अपघातात दुर्दैवी अंत; नातवाचा मृतदेह पाहून आज्जीनेही सोडले प्राण
सोलापूर बातम्या: सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातून एक अतिशय धक्काडाईक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीनेएकल आपला जीव सोडला आहे? या दुर्दैवी घटमुळे अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील हन्नूर गावातील व्हनमाने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे?
कारने जोरदार धडक दिल्यामुळे आदित्यचा अपघातात मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसारएकुलता एक नातू अपघातात मृत्यू पावला त्यामुळे दु: ख सहन नाही झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारावेळी आजी जनाबाई व्हानमाने यांनीही जीव सोडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावाजवळ आदित्य व्हनमाने या मुलाचा कारने जोरदार धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला होता. आदित्य हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात इयत्ता नववी शिकत होता. आदित्यने शाळा सुटल्यानंतर खाजगी दुचाकीस्वाराला हात करत गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली. फक्त त्याएफ आणिवेळी दुचाकीवर निघालेल्या आदित्यला एका कारचालकने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती ते गाडीवरील चालक जखमी झाला, तर दुर्दैवी ठरलेल्या आदित्यचा अपघातात मृत्यू झाला.
आदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत पाहिल्यानंतर आजीला धक्का
दरम्यानआदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत पाहिल्यानंतर आजीला धक्का बसला. परिणामी आजीला जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी आजी आणि नातवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे हन्नूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुर्डू प्रकरणाला वेगळे वळण, चौकशीसाठी एसआयटी नेमा, राम सातपुते यांची मागणी
सोलापूर जिल्ह्याचा वाल्मीक कराड हे धैर्यशील मोहिते पाटील असून अकलूज परिसरात झालेल्या तरुणांच्या खुन मालिकेबाबत माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी केलेल्या आरोपानंतर आता माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण प्रकाराची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून करण्याची मागणी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काल झालेल्या कुर्डू बंदमध्ये भाषणात माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर या आरोपांना थेट कायदेशीर भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला होता. आता या प्रकरणात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी उडी घेतली असून अकलूजला हे सर्व नवीन नाही. जमिनी बळकावणे गुंडगिरी करणे खून करणे, हा यांचा इतिहास आहे. असा आरोप सातपुते यांनी केला आहे. अकलूजचा आका कोण याची चौकशी आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी करावी, यासाठी आपण पत्र देणार असल्याचे राम सातपुते यांनी सांगितले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.