सोलापूरात ठाकरे अन् शिंदेंची शिवसेना एकत्र; अजितदादा-शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही साथ, जिल्हा
सोलापूर झेडपी निवडणूक 2026: राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, याची प्रचिती सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यात पुन्हा एकदा आली आहे. राज्यभरात एकमेकांविरोधात उभ्या असलेल्या शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP Sharad Pawar Faction) आणि अजित पवार गट (NCP Ajit Pawar Faction) हे बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. भाजपविरोधात या चारही पक्षांनी मिळून महाआघाडी स्थापन केल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या महाआघाडीची अधिकृत घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे. त्यांनी आज सायंकाळी चार वाजता बार्शीत होणाऱ्या निर्धारण मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकर्ते आणि नागरिकांना केले आहे.
बार्शी तालुक्यातील राजकारण हे नेहमीच आमदार दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन प्रमुख नेत्यांभोवती फिरत आले आहे. पक्ष कोणताही असो, निवडणुकीचा सामना प्रामुख्याने या दोन गटांमध्येच रंगताना दिसतो. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी विरुद्ध माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजप असा थेट सामना होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Solapur ZP Election 2026: बार्शीतील निवडणूक चुरशीची होणार
राज्यभरात भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत असले, तरी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकाच व्यासपीठावर येणे ही बार्शीच्या राजकारणातील मोठी आणि अनपेक्षित घडामोड मानली जात आहे. या राजकीय घडामोडीमुळे जिल्हा परिषद निवडणूक अधिकच चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आज होणाऱ्या निर्धारण मेळाव्यात महाआघाडीच्या रणनीतीसह उमेदवार निवड, प्रचाराची दिशा आणि भाजपविरोधातील पुढील राजकीय भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.