जे.पी.नड्डांची मध्यस्थी, शाहांचं प्लॉनिंग अन् सोनम वांगचुक यांची संमती; उपोषण सोडण्यामागची ‘इनस

Sonam Wangchuk Hunger Strike : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk Hunger Strike) यांनी अखेर आपले अमरण उपोषण मागे घेतले आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण (Sonam Wangchuk Hunger Strike) सोडण्याच्या या निर्णयामागे केंद्र सरकार आणि त्यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय चर्चेची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर सरकार आणि सोनम वांगचुक यांच्यात सहमती झाली. केंद्रीय मंत्र्यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांना आश्वासनाचे पत्र सोपवले, त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.(Sonam Wangchuk Hunger Strike)

Sonam Wangchuk Hunger Strike :  ४ तास चालली केंद्रीय मंत्र्यांची बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात सुमारे चार तास उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत वांगचुक यांच्या मागण्या आणि त्यांच्या खालावत चाललेल्या आरोग्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांचे आरोग्य आणि सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही ठरवण्यात आले.(Sonam Wangchuk Hunger Strike)

Sonam Wangchuk Hunger Strike :  अमित शाहांचे निर्देश अन् वांगचुक यांच्या पत्नीशी संवाद

गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नीशी फोनवर चर्चा केली. वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकार गांभीर्याने विचार करत असून, तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी दिला. याच संवादादरम्यान त्यांनी वांगचुक यांना आपले आमरण उपोषण मागे घेण्याचे आवाहनही केले.

त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह हे गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पोहोचले, जिथे त्यांनी सोनम वांगचुक यांना सरकारतर्फे आश्वासनाचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. चर्चेची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सरकार उद्या एका तटस्थ ठिकाणी ‘CJP’ च्या प्रतिनिधी मंडळाला औपचारिक चर्चेसाठी आमंत्रित करेल, असेही दोन्ही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Sonam Wangchuk Hunger Strike :  DoPT चे नवीन विधेयक संसदेत मांडणार

सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेदरम्यान सरकारने वांगचुक यांना आश्वासन दिले की, ‘कार्मिक आणि प्रशिक्षण विभागा’च्या (DoPT) अंतर्गत तयार करण्यात आलेले नवीन विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर केले जाईल. या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Sonam Wangchuk Hunger Strike :  वांगचुक यांनी लडाखला परतण्याची इच्छा केली व्यक्त

सोनम वांगचुक यांनीही आपण लवकरच लडाखला परत जाऊ इच्छित असल्याचे सरकारला सांगितले. मात्र, लडाखला परतण्यापूर्वी आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची आणि समर्थकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रांनुसार, वांगचुक हे विद्यार्थ्यांना सरकारच्या या आश्वासनावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करतील. याशिवाय, आंदोलनाची मूळ भावना टिकून राहावी यासाठी आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे आणि कोणत्याही असामाजिक तत्त्वांच्या अपप्रचाराला किंवा चिथावणीला बळी पडू नये, अशी विनंतीही ते करणार आहेत. वांगचुक यांनी सरकारलाही विश्वास दिला की, ते यापुढेही शांततापूर्ण संवाद आणि रचनात्मक चर्चेचे समर्थन करत राहतील; तसेच संवादाच्या माध्यमातून मार्ग काढता यावा यासाठी प्रदर्शनकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करतील.

Comments are closed.