नाटकांच्या नांदीची रंगणार सुरेल मैफल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्व. विद्याधर गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त रंगशारदा प्रतिष्ठान आणि विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडितराज ते बावनखणी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटकातील नांदी आणि नांदीस्वरूप गीतांची सुरेल सफर या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे.

शुभदा दादरकर आणि श्रीकांत दादरकर यांच्या संकल्पना व आरेखनातून साकारलेल्या या कार्यक्रमात धवल भागवत, गीता देशपांडे, गौतम कामत, प्रतीक फणसे आणि अन्य कलाकार सहभागी होणार असून त्यांना संगीत साथ करणार आहेत केदार भागवत आणि आदित्य पानवळकर. ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, गायक-अभिनेते ज्ञानेश पेंढारकर आणि संजय गोखले यांचा विशेष सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ आहे.

शनिवार, 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरातील साळगावकर रंगमंचावर हा कार्यक्रम रंगणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.