सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘सामना’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन, डॉ. जब्बार पटेल यांच्याशी मुक्तसंवाद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि ‘सामना’ चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’च्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’तर्फे ‘सामना’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन तसेच चित्रपट निर्माते रामदास फुटाणे आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याशी 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाटय़गृहात हा कार्यक्रम होईल.

‘चित्रपट रसास्वाद मंडळा’चे सदस्य तसेच मराठी चित्रपटप्रेमींनी या विशेष प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्पृतिक विकास महामंडळाने केले आहे.

Comments are closed.