INDvsWI: टी20 मालिकेआधी अचानक बदलला संघ! विडींज संघात धोकादायक फलंदाजाची एंट्री
एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. याची सुरूवात ६ ऑक्टोबरपासून होणार असून पहिला सामना लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी पाहुण्या संघात अचानक एक बदल झाला आहे. वेस्ट इंडिजच्या संघात धोकादायक फलंदाजाची एंट्री झाली आहे.
बोटाच्या दुखापतीमुळे ज्वेल ऍंड्र्यू पहिला टी२० सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी कॅरेबियन संघात आमिर जांगूचा समावेश करण्यात आला आहे.
ऍंड्र्यूला भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती. त्याला अद्याप टी२० मालिकेतून वगळलेले नाही. त्याच्या फिटनेसवर लक्ष असून १९ वर्षीय खेळाडूचा एकदिवसीय संघातही समावेश होता. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला, तर त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळले होते.
तिसऱ्या सामन्यात ऍंड्र्यूला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली होती, मात्र क्षेत्ररक्षणावेळी त्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याची तपासणी झाली असता त्याला कोणतेही फ्रॅक्चर नसल्याचे आढळले.
जांगूच्या येण्याने वेस्ट इंडिजचा संघ आणखी मजबूत झाला आहे. तो डावखुरा विकेटकीपर-फलंदाज असून त्याने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने तीन डावांत एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या सहाय्याने २३९ धावा केल्या.
जांगूने केवळ सात टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एका अर्धशतकासह १६३ धावा केल्या आहेत. त्याची आकडेवारी वाईट असली तरी, तो भारताविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिला. यामुळे तो टी२०ची आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न करेल.
भारताच्या टी२० संघाने नुकतेच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण पदक पटकावले आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे सुवर्ण पदक जिंकले होते. आता कॅप्टन अय्यर ऍंड कंपनीचे पुढील लक्ष्य वेस्ट इंडिज संघ आहे.
टी २० मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी रांची येथे, तिसरा सामना ११ ऑक्टोबर रोजी इंदौर येथे, चौथा सामना १४ ऑक्टोबर रोजी हैद्राबाद येथे आणि पाचवा सामना १७ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. (Squad changed suddenly ahead of T20 series, Aamir Jangoo joins West Indies squad IND vs WI)
Comments are closed.